कासारवाडीत तरुणाची आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कासारवाडीत तरुणाची आत्महत्या
कासारवाडीत तरुणाची आत्महत्या

कासारवाडीत तरुणाची आत्महत्या

sakal_logo
By

पिंपरी, ता. ५ : दुमजली उड्डाणपुलावरून उडी मारून तरुणाने आत्महत्या केल्याची घटना कासारवाडी येथे घडली.
शुभम कांबळे (वय २७, रा. सम्राटनगर, पिंपळे सौदागर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. बुधवारी (ता. ५) दुपारी साडेतीनच्या सुमारास शुभम हे कासारवाडीतील पुलावरील भोसरीकडे जाणाऱ्या मार्गिकेवर दुचाकीवरून आले. तेथे दुचाकी उभी करून खाली उडी मारली. रस्त्यावर पडल्याने ते गंभीर जखमी झाले. उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ते अविवाहित होते.
दरम्यान, शुभमजवळ चिठ्ठीत ‘मला जीवनात एकाकी झाल्यासारखा वाटत असल्याने मी आत्महत्या करीत आहे, माझ्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नये'' असे नमूद असल्याची माहिती पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम यांनी दिली.
----------------

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60598 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top