
निवडणूक साहित्य खरेदीस ''स्थायी''च्या बैठकीत मान्यता
पुणे, ता. ५ : सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेचा कार्यक्रम दोन आठवड्यात जाहीर करा, असे आदेश दिलेले असताना पुणे महापालिकेनेही निवडणुकीची तयारी सुरू आहे. निवडणुकीचे साहित्य खरेदी करण्यासाठी आज (ता. ५) ७० लाख रुपयांच्या खरेदीस प्रशासकांनी स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता दिली.
प्रशासक विक्रम कुमार यांनी स्थायी समितीची बैठक घेतली. त्यामध्ये निवडणुकीच्या तयारी व प्रक्रियेतील वापरासाठी आवश्यक असलेले साहित्य खरेदी करण्याच्या ७० लाखाच्या निविदेस मान्यता दिली. यामध्ये कार्यालयीन कामासाठी आवश्यक असणारे पेन, स्टेपलर, पीन, टाचणी, पेपर, रजिस्टर, फाइल यासह सुमारे ८० वस्तूंचा यामध्ये समावेश आहे.
पुणे महापालिकेची प्रभाग रचना हरकती सूचना घेऊन, त्याचा बदलाचा अंतिम अहवाल निवडणूक आयोगाला सादर झालेला आहे. मात्र, ही प्रभाग रचना राज्य सरकारने रद्द केली व नव्याने प्रभाग रचना करण्याचे आदेश ही दिलेले आहेत. अशी परिस्थिती असताना सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय आला, त्यामुळे पुन्हा एकदा जुनीच प्रभाग रचना राहणार की नव्याने तयार होणार?,निवडणुका लगेच होणार की पावसाळ्यानंतर होणार? असे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. दरम्यान, महापालिका प्रशासनाने निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60600 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..