सिंबायोसिसला मिळणार ७५ लाखांचे अनुदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिंबायोसिसला मिळणार ७५ लाखांचे अनुदान
सिंबायोसिसला मिळणार ७५ लाखांचे अनुदान

सिंबायोसिसला मिळणार ७५ लाखांचे अनुदान

sakal_logo
By

पुणे, ता. ६ : ‘‘देशातील विद्यापीठांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर अभ्यास आणि संशोधनासाठी सुरू करण्यात येणाऱ्या अध्यासनाला केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयातर्फे दरवर्षी ७५ लाख रुपयांचे अनुदान देण्यात येते. पुण्यातही ‘सिंबायोसिस’ने डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय आणि स्मारकात अशा प्रकारचे अध्यासन सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. संस्थेला हे अध्यासन सुरू करण्यासाठी केंद्रीय मंत्रालयातर्फे अनुदान देण्यात येईल’’, अशी घोषणा केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांनी केली.

सिंबायोसिस शिक्षण संस्थेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय आणि स्मारक यंदा रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करत आहे. यानिमित्त ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर होलोग्राम’चे उद्‌घाटन शुक्रवारी डॉ. वीरेंद्र कुमार यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले, विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर, संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार, स्मारकाच्या मानद संचालिका संजीवनी मुजुमदार, ‘सिंबायोसिस शिक्षण संस्थेच्या प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकरही उपस्थित होते.

रामदास आठवले यांनी माई आंबेडकर आणि मुजूमदार कुटुंबामध्ये असणारे जिव्हाळ्याचे नाते उलगडले. तसेच केंद्र सरकारने सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयासाठी यंदा एक लाख ४२ हजार ३४२ कोटी रुपयांचे बजेट दिले आहे. अन्य मंत्रालयांच्या तुलनेत अर्थसंकल्पात दिलेली ही तरतूद चांगली असल्याचेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमात ‘पुरी दुनिया मे हे बाबासाहेब का नाम, हम पुरा करेंगे उनका अधुरा काम’,‘शिक्षणाच्या कामात ज्यांनी कधीच मानली नाही हार, त्यांचे नाव आहे डॉ. मुजूमदार’ अशा शीघ्र कविता करत आठवले यांनी कार्यक्रमात आपल्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमात संजीवनी मुजूमदार यांनी प्रास्ताविक केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी केंद्रीय मंत्रालयातर्फे सहकार्य केले जाते. त्या अंतर्गत हे अध्यासन स्थापन करण्यात येईल. बाबासाहेबांच्या जीवनचरित्रावर अभ्यास आणि संशोधन करण्यासाठी अध्यासनाच्या माध्यमातून काम होईल. हे अध्यासन संशोधन केंद्रासारखे काम करणार असून, त्यामार्फत विद्यार्थ्यांना संशोधन करता येईल.
डॉ. वीरेंद्र कुमार, केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री

डॉ. बाबासाहेब आंबेडकर होलोग्रामचे वैशिष्ट्य
- खुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाषण करत आहेत असा अनुभव देणारी रचना
- ‘थ्रीडी होमोग्राफी’ तंत्रज्ञानाचा वापर
- ‘सी-डॅक’चे होलोग्रामला तांत्रिक सहाय्य

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60705 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top