संजय घोडावत ग्रुप पुण्यामध्ये इंटरनॅशनल स्कूल सुरू करणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संजय घोडावत ग्रुप पुण्यामध्ये 
इंटरनॅशनल स्कूल सुरू करणार
संजय घोडावत ग्रुप पुण्यामध्ये इंटरनॅशनल स्कूल सुरू करणार

संजय घोडावत ग्रुप पुण्यामध्ये इंटरनॅशनल स्कूल सुरू करणार

sakal_logo
By

पुणे, ता. ६ : शिक्षणाचे माहेर घर असलेल्या पुण्यात संजय घोडावत ग्रुपच्यावतीने (एसजीजी) आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा सुरू करण्यात येणार आहे. यामाध्यमातून सीबीएसई, आयजीसीएससीई आणि आयबी या तिन्ही बोर्डांचे शिक्षण दिले जाणार असल्याची माहिती ‘एसजीजी’चे अध्यक्ष संजय घोडावत यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

याप्रसंगी ‘घोडावत रिटेल’चे श्रेणिक घोडावत, सलोनी घोडावत आदी उपस्थित होते. एसजीजी हा देशातील अग्रगण्य व्यावसायिक समूह असून हवाई वाहतूक, ग्राहकोपयोगी उत्पादने, शिक्षण, ऊर्जा, टेक्स्टाईल आणि रिटेल ही या समूहाची काही प्रमुख व्यवसाय क्षेत्र आहेत. ‘एसजीजी’तर्फे पुढील तीन वर्षांत विविध व्यावसायिक क्षेत्रांचा विस्तार करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.

संजय घोडावत म्हणाले, ‘‘कोल्हापूर येथील इंटरनॅशनल स्‍कूलमध्ये पाच हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत असून यात पुण्यातील सुमारे ५०० विद्यार्थ्यांचा समावेश आहे.’’ पुढील तीन वर्षांत ‘स्टार लोकलमार्ट’चे देशात विविध राज्यांमध्ये किमान तीन हजार स्टोअर असतील. यामुळे २५ हजारांहून अधिक लोकांना रोजगार मिळेल. तसेच ‘स्टार एअर’मध्ये सध्या पाच विमाने असून येत्या काळात आणखीन पाच विमाने घेण्यात येणार आहेत. आतापर्यंत ‘स्टार एअर’ने चार लाख प्रवाशांचा टप्पा ओलांडला असल्याचे श्रेणिक घोडावत यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60706 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top