क्विल्ट इंडिया फाउंडेशनचा आज ‘ट्रॅव्हलिंग ट्रंक शो’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

क्विल्ट इंडिया फाउंडेशनचा
आज ‘ट्रॅव्हलिंग ट्रंक शो’
क्विल्ट इंडिया फाउंडेशनचा आज ‘ट्रॅव्हलिंग ट्रंक शो’

क्विल्ट इंडिया फाउंडेशनचा आज ‘ट्रॅव्हलिंग ट्रंक शो’

sakal_logo
By

पुणे, ता. ५ ः कोविड, लॉकडाउन, प्रवासबंदी, युद्धजन्य परिस्थिती अशा गेल्या दोन वर्षांतील मानवजातीच्या अभिव्यक्तीवर आधारित भारतीय कलाकारांनी बनवलेल्या रजईंचा ‘अनेक चेहरे’ या नावाचा क्विल्ट इंडिया फाउंडेशनचा ट्रॅव्हलिंग ट्रंक शो शनिवारी (ता. ७ ) कोंढव्यातील बाणी क्विल्टस् येथे आयोजित करण्यात आला आहे.
क्विल्ट इंडिया फाउंडेशनने द मेनी फेसेस (अनेक चेहरे) या नावाने यापूर्वी ट्रॅव्हल ट्रंक शो केले आहेत. त्यामध्ये भारतीय कलाकारांनी बनवलेल्या रजईंचा संग्रह आहे. कोविड, लॉकडाउन, प्रवास बंदी, विभक्त कुटुंबांसह गेल्या दोन वर्षांतील घडामोडींच्या उलथापालथी आणि अलीकडील युद्धाच्या वेदना या मानवजातीसाठी आव्हाने आहेत. नेहमीप्रमाणे आनंदाचे क्षण आणि घाईघाईने हसू, प्रेरणा हे कलात्मक अभिव्यक्ती स्वरूपात येतात. हा ट्रंक शो अशा घटनांवर लक्ष केंद्रित करतो आणि फॉर्म, आकार, रचना याद्वारे ‘चेहरे’च्या विविध व्याख्यांच्या शोधावर त्यांचा प्रभाव दिसतो.
भारतीय कलाकारांनी बनवलेल्या या ३३ रजई आता आंतरराष्ट्रीय पुरस्कारांकडे वाटचाल करत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर वैशिष्टयपूर्ण आणि वेगळेपण असलेल्या रजईचा संग्रह या ट्रंक शोच्यानिमित्ताने वेगवेगळ्या रूपात सादर होणार आहे. देशात विविध ठिकाणी झालेल्या शोनंतर आता पुण्यात बाणी क्विल्टस-आरएच ३, सनफ्लॉवर अपार्टमेंट्स, एनआयबीएम रोडच्या बाहेर, साळुंके विहार, टेलिफोन एक्सचेंज जवळ, नारायण अण्णाजी शिंदे मार्ग, कोंढवा, पुणे येथे हा शो होणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60709 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top