
लोकमान्यांच्या अभिप्रेत स्वातंत्र्याला देश परागंदा
पुणे, ता. ६ : स्वातंत्र्य हे कोणत्याही सरकारचे उपकार नाही. तर तो प्रत्येकाचा जन्मसिद्ध हक्क आहे. लोकमान्यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, या सिंहगर्जनेतून तो मांडला. मात्र आज प्रत्येक ठिकाणी स्वातंत्र्याचा गळा घोटल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. गरिबी, अन्याय, बेरोजगारी आणि अज्ञान जो पर्यंत दूर होत नाही, तो पर्यंत खऱ्या अर्थाने आपण स्वतंत्र नाही, असे मत माजी केंद्रीयमंत्री पी. चिदंबरम यांनी व्यक्त केले.
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या १०१ व्या वर्धापनदिन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कुलपती डॉ. दीपक टिळक, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स लंडनचे अध्यक्ष अॅड. संतोष शुक्ला, कुलगुरू डॉ. गीतांजली टिळक, उपाध्यक्ष डॉ. रोहित टिळक, डॉ. प्रणिती टिळक, कुलसचिव डॉ. अभिजित जोशी यावेळी उपस्थित होते. विद्यापीठाच्या गौरव ग्रंथाच्या अनावरणाबरोबरच सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्र येत साकारलेल्या वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डही यावेळी प्रदान करण्यात आला.
टिमवीचे वेगळेपण सांगताना डॉ. दीपक टिळक म्हणाले, स्वदेशी उद्योग, कृषी, व्यापार आणि अर्थकारणाला अभिप्रेत शिक्षण टिमवीत दिले जाते. स्वातंत्र्यपूर्व काळात स्वदेशी उद्योगांसाठीचे कुशल मनुष्यबळ याच संस्थेतून निर्माण झाले. त्या काळात अनेक संस्था ब्रिटिशांना अपेक्षित शिक्षण देत होत्या. पण टिमवी मात्र राष्ट्रीय शिक्षणावर ठाम आहे. कनिष्ठ महाविद्यालय आणि प्राथमिक ते उच्चमाध्यमिक शाळेसाठी परवानगी मिळाली आहे.’’ महापालिकेने आमची जमीन पळवली असून, आम्ही ती नक्की परत मिळविणार असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
चिदंबरम म्हणाले
- स्वातंत्र्याशिवाय काहीच शक्य नसल्याचे लोकमान्यांनी हेरले
- आज विरोधी ट्वीट केले तरी अटक होते. दररोज स्वातंत्र्याचा गळा घोटला जातोय
- सरकारने आपल्याला नाही तर आपण सरकारला अधिकार दिले आहेत
- प्रत्येक राजसत्ता प्रजेवर वचक ठेवण्याचा प्रयत्न करते
- लोकमान्यांप्रमाणेच आपण व्यक्ती आणि राज्यसंस्थेचे नाते समजून घ्यायला हवे
- लिहिणे, बोलणे, चालणे, आदी मूलभूत अधिकारांवर कोणीच गदा आणू शकत नाही
नागरिकांना अधिकारांची कल्पना नाही
टिळक महाराष्ट्र स्पोर्ट्स लीगने एकाच दिवशी मोठ्या खेळामध्ये भाग घेत जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. देशातील लाखो लोकांना अजूनही शिक्षण आणि आरोग्याच्या सुविधा मिळालेल्या नाहीत. त्यांना अजूनही आपल्या अधिकारांची कल्पना नाही. त्यासाठी आपण काम केले पाहिजे.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60752 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..