
ओळख पुस्तकांची अभिवाचन स्पर्धा निकाल घोषित
(या बातमीत सकाळ एनआयईचा लोगो वापरावा- सर्व आवृत्त्या)
------------------------------
पुणे, ता. ६ ः सकाळ माध्यम समूहाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या सकाळ एनआयई (न्यूजपेपर इन एज्युकेशन) उपक्रम व मातृमंदिर विश्वस्त संस्था, निगडी पुणे यांच्या वतीने ‘शिक्षकांसाठी ओळख पुस्तकांची’ ही राज्यस्तरीय ऑनलाइन अभिवाचन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला राज्यातील विविध भागातून शिक्षकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
यामध्ये विविध पुस्तकांचे परिक्षण, अभिवाचन व सादरीकरण शिक्षकांनी केले. जिल्हा परिषद, महापालिका, प्राथमिक व माध्यमिक विभाग या चार गटांतून सादरीकरण, पुस्तक परिचय, परीक्षण, अभिवाचन व परिणाम या निकषांवर गुणांकन करण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण प्रा. तुकाराम पाटील, पितांबर लोहार, सुहासिनी पानसे यांनी केले. विजेत्यांना लवकरच ‘सकाळ’कडून संपर्क करण्यात येईल. गुणांनुसार गटनिहाय निकाल पुढीलप्रमाणे.
-----------
जिल्हा परिषद शाळा विभाग गट ः
शैलजा नाईकवाडे ( जि.प. प्राथमिक शाळा गणोरी, फुलंब्री औरंगाबाद), दीपाली जाधव (जि.प. प्राथमिक शाळा गारवडी, ता. खटाव सातारा), अनुजा धस (जि.प. शाळा गोवित्री मावळ, पुणे) आत्माराम जगदाळे (जि.प. शाळा महाळुंगे पडवळ, ता. आंबेगाव, जि. पुणे), चंद्रकांत बोऱ्हाडे (जि.प. शाळा आहिरे ता. खेड, जि. पुणे), योगिता मापारी (जि.प. शाळा मेढा जावळी, ता. सातारा), कालिंदी कस्पटे (जि.प. शाळा संत तुकारामनगर, सुदुंबरे, ता. मावळ, जि. पुणे), मयुरेश कुलकर्णी (जि.प. शाळा सांजवड, सोलापूर), महेश इंगळे (जि.प. शाळा गोलेगाव, शिरूर, पुणे) आणि (विभागून) अश्विनी वाडेकर (जि.प. शाळा नेहरेशिवार, कडूस, ता. खेड), निलेशकुमार इंगोले (जि.प. शाळा बऱ्हानपूर, अमरावती) प्रगती रेटावडे (जि. प. शाळा टाकळकरवाडी, खेड, पुणे).
---
महानगरपालिका शाळा ः मीनाक्षी जगताप (मनपा शाळा १२७- मुले पुणे), लता पाडेकर (लोकनेते यशवंतराव चव्हाण विद्यानिकेतन क्रमांक ६, येरवडा, पुणे), राजश्री भोसले ( मनपा शाळा क्रमांक १९- वडगावशेरी, पुणे), अपर्णा ढोरे (पिं.चि. मनपा खराळवाडी, पिंपरी), सीमा कारंडे (मनपा शाळा सांताक्रूझ, पूर्व मुंबई), रामकृष्ण पवार (नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालय, येरवडा, पुणे), मुक्ता आसवले (पिं.चि.मनपा पिंपळेगुरव, पुणे), सुरेखा कुंजीर (पिं.चि. मनपा, पिंपळेनिलख), आयुब कलाम शेख (मनपा शाळा क्रमांक १७४-बी, कोंढवा, पुणे), ज्योत्स्ना पास्ते (कर्नल यंग प्राथमिक शाळा क्रमांक ४५, येरवडा, पुणे)
---------------
प्राथमिक विभाग ः
स्नेहा कुलकर्णी (श्रीमती पार्वतीबाई विद्यालय, श्रीधरनगर, चिंचवड, पुणे) आणि वृषाली देशमुख (तोमाई प्राथमिक शाळा, कठोरा अमरावती) विभागून, सुरेखा भामरे (एच. ए. स्कूल, पिंपरी, पुणे), अर्चना राजोपाध्ये (विद्या प्रतिष्ठान, न्यू बालविकास मंदिर, पिंपळी, बारामती), मंदा कोकरे (गीता मंदिर प्राथमिक शाळा, चिंचवड, पुणे), रुक्मिणी फडतरे (विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूल, बारामती, पुणे), कविता भगत (हिरा इंग्लिश मीडियम स्कूल, खानापूर, जुन्नर, पुणे) आणि शिल्पा दिक्षीत (ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय, निगडी) विभागून, सचिन गायकवाड (शेठ केशरचंद पारेख प्राथमिक विद्यालय, राजगुरुनगर, पुणे), स्नेहल भिडे (जनहित प्रतिष्ठान प्राथमिक विद्यालय, बारामती, सीमा यादव (मातृ विद्यालय, वाल्हेकरवाडी, पुणे), राणी जाधव (अनुदानित आश्रमशाळा फुलवडे, आंबेगाव, पुणे).
--------------------
माध्यमिक विभाग ः
नागेश जोशी (ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय, निगडी, पुणे), प्राची कुलकर्णी (महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटी, पुणेचे सीबीएसई स्कूल, सांगली), दीपाली तारे (आचार्य श्री विजय वल्लभ सेकंडरी स्कूल, भवानी पेठ, पुणे) पल्लवी देशमुख (श्रीमती दादीबाई देशमुख हिंदू गर्ल्स स्कूल, महाल, नागपूर), डॉ. प्रतिक्षा बोरडे (मोह विद्यालय, जि. ठाणे), सीमा शेलार (नवोन्मेष विद्या मंदिर, चाकण, पुणे), सुषमा तगारे (एस.पी.एम स्कूल, निगडी,
पुणे), अंकुश काळे (वनवासी आश्रमशाळा, उत्तेखोल माणगाव, ता. रायगड) आणि कुबेर शेंडबाळे (छत्रपती शाहू विद्यालय पॅलेस, कोल्हापूर ) विभागून, अभिषेक जोशी (बाळासाहेब भारदे हायस्कूल शेवगाव, अहमदनगर), रवींद्र गडकर (ग. भि. देशपांडे विद्यालय, बारामती) आणि डॉ.चंद्रशेखर भारती (सरस्वती विद्या मंदिर भांडूप मुंबई) विभागून, अश्विनी दुर्गुडे (कॅम्प एज्युकेशन सोसायटी हायस्कूल, पुणे), संतोष कदम (विद्या प्रतिष्ठान न्यू इंग्लिश मीडियम स्कूल, बारामती), शुभदा नगरकर (महात्मा जोतिराव फुले हायस्कूल, आदमबाग, पुणे), उर्वशी डावरे (श्रीमती दादीबाई देशमुख हिंदू गर्ल्स स्कूल, महाल, नागपूर), मोनिका काळे (एस.पी.एम स्कूल, निगडी), नीता शेटे (नवमहाराष्ट्र विद्यालय मुले, पिंपरी), विठ्ठल मोहिते (कोंडाबाई कुंडलिक सांळुखे हायस्कूल, हरिपूर सांगली), रंजना चौधरी (एस.पी.एम. स्कूल, निगडी, पुणे)
-----
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60805 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..