कॉसमॉस बॅंक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कॉसमॉस बॅंक
कॉसमॉस बॅंक

कॉसमॉस बॅंक

sakal_logo
By

कॉसमॉस बँकेच्या उपाध्यक्षपदी सचिन आपटे

पुणे, ता. ६ ः कॉसमॉस बँकेचे विद्यमान उपाध्यक्ष ॲड. प्रल्हाद कोकरे यांनी नवीन संचालकांना संधी देण्यासाठी उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्या पदावर बँकेचे संचालक सचिन आपटे यांची बँकेच्या उपाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे.

ॲड. कोकरे हे बँकेमध्ये जानेवारी २००५ पासून संचालक म्हणून कार्यरत आहेत. जानेवारी २०२० मध्ये त्यांची बँकेच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. नवनिर्वाचित उपाध्यक्ष सचिन आपटे हे जानेवारी २०२० मध्ये बँकेचे संचालक म्हणून निवडून आले आहेत. आपटे हे सिव्हिल इंजिनिअर असून देश-परदेशात बांधकाम व्यवसायामध्ये यशस्वी उद्योजक म्हणून कार्यरत आहेत, तसेच बँकेच्या सेवक प्रतिनिधी पदावर बँकेचे लेखनिक रविशंकर कोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते बँकेमध्ये एप्रिल १९९२ पासून कार्यरत आहेत.

------------

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60810 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top