लक्झरी गाडी घेण्याची आकांक्षा ‘स्पिनी मॅक्स’द्वारे होणार पूर्ण ‘स्पिनी मॅक्स’द्वारे होणार पूर्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लक्झरी गाडी घेण्याची आकांक्षा
‘स्पिनी मॅक्स’द्वारे होणार पूर्ण 
‘स्पिनी मॅक्स’द्वारे होणार पूर्ण
लक्झरी गाडी घेण्याची आकांक्षा ‘स्पिनी मॅक्स’द्वारे होणार पूर्ण ‘स्पिनी मॅक्स’द्वारे होणार पूर्ण

लक्झरी गाडी घेण्याची आकांक्षा ‘स्पिनी मॅक्स’द्वारे होणार पूर्ण ‘स्पिनी मॅक्स’द्वारे होणार पूर्ण

sakal_logo
By

पुणे, ता. ६ ः वापरलेल्या कार्सची खरेदी आणि विक्री कऱणाऱ्या ‘स्पिनी’ या देशातील अग्रगण्य ‘फुल स्टॅक प्लॅटफॉर्म’ने आपला लक्झरी सेगमेंट ‘स्पिनी मॅक्स’ सादर केला आहे. त्याच्या माध्यमातून प्रथम वापरलेल्या लक्झरी कार्सचे व्यवहार राष्ट्रीय स्तरावर करण्यात येतात. देशातील विविध शहरांत लक्झरी कार्स सुलभतेने मिळणार आहेत.

मर्सिडीज- बेंझ, बीएमडबल्य्, ऑडी, जॅग्वार आणि लॅंड रोव्हरसारख्या सुमारे ५०० प्रकारच्या अलिशान गाड्या या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत आणि संपूर्ण देशातील २५० शहरांत त्याचे वितरण करण्यात येते. ‘स्पिनी मॅक्स’ सादर करताना ‘स्पिनी’चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नीरज सिंग म्हणाले, ‘‘प्रत्येकाला चांगल्या गुणवत्तेची कार मिळायला हवी. या तत्त्वावर ‘स्पिनी’ची स्थापना करण्यात आली. देशातील युवकांमध्ये खर्च करण्याची महत्त्वाकांक्षा असल्याचे दिसून येते. आलिशान गाड्यांबद्दल त्यांचे आकर्षण पाहून लक्झरी गाड्यांच्या बाजारपेठेत आपलेही एक स्थान असायला हवे, असे उद्दिष्ट बाळगले. त्यातूनच स्पिनी मॅक्सची सुरवात केली. आमच्याकडील प्रत्येक कारची कसून तपासणी केली जाते. ती चालवून पाहिली जाते आणि ग्राहकांचा आनंद व साधेपणा लक्षात घेऊन उच्च दर्जाच्या गुणवत्तेद्वारे या गाड्यांची विक्री केली जाते.’’

लक्झरी गाड्यांच्या संभाव्य खरेदीसाठी स्पिनी मॅक्स ही एक महत्त्वाची पायरी आहे. हा ब्रॅंड ‘ॲक्ससिबल लक्झरी’ या शब्दांवर जोर देतो. कारण चांगल्या प्रकारे सांभाळलेल्या लक्झरी कारचा साठा स्पिनी मॅक्सकडे आहे. मनी बॅंक गॅरंटी आणि वर्षा-वर्षाच्या वॉरंटीसह मालकी हक्काचा अनुभव देण्याचीही जबाबदारी हा ब्रॅंड घेतो. अनेक भारतीयांच्या लक्झरी गाड्या घेण्याच्या आकांक्षा स्पिनी मॅक्सद्वारे पूर्ण होऊ शकतात, असेही नीरज सिंग यांनी सांगितले.
---------

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60875 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top