क्षमता वाढणार, पण सेवेत मर्यादा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

क्षमता वाढणार, पण सेवेत मर्यादा!
क्षमता वाढणार, पण सेवेत मर्यादा!

क्षमता वाढणार, पण सेवेत मर्यादा!

sakal_logo
By

पुणे, ता. ६ : ‘‘लोहगाव विमानतळाचे विस्तारीकरण झाल्यानंतर सध्याच्या तुलनेत त्याची क्षमता चारपट वाढणार आहे. मात्र, त्यानंतरही लोहगाव येथून पुणेकरांना सेवा देताना मर्यादांचा सामना करावा लागणार आहे,’’ असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी (ता. ६) व्यक्त केले.

‘सायन्स टेक्नॉलॉजी पार्क’चे पाठबळ असलेल्या पाच स्टार्टअपचे अनावरण गडकरी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. पुणे हा जगातील एकमेव जिल्हा आहे, ज्याची लोकसंख्या सुमारे ७० लाख असूनही येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ नाही. आपल्यासाठी ही अत्यंत खेदाची बाब आहे, अशी भावना पार्कचे उपाध्यक्ष आणि ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी कार्यक्रमात व्यक्त केली होती. त्यावर गडकरी स्पष्ट करताना म्हणाले, ‘‘लोहगाव विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी हवाई दलाने १३ एकर जागा देण्याचे मान्य केले आहे. त्या बदल्यात हवाई दलाला चंडीगड येथे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची जागा दिली जाणार आहे. जागेच्या प्रत्यक्ष देवाण-घेवाणीबाबत हवाई दलाशी लवकरच चर्चा करण्यात येणार आहे. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठीचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.’’

पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साखरेचे उत्पादन होते. मात्र, मागणीपेक्षा जादा उत्पादन झाल्यास साखरेचा भाव गडगडेल. त्यामुळे साखर कारखानदारांनी साखरेपासून इथेनॉल निर्मितीकडे वळाले पाहिजे. ‘फ्लेक्स इंजिन’ असलेली वाहने बाजारात आल्यानंतर इथेनॉलची मागणी वाढणार आहे. देशात गेल्या वर्षभरात इलेक्ट्रिक वाहनांमध्ये तेराशे टक्क्यांनी वाढ झाली आहे. सध्या देशात १२ लाख इलेक्ट्रिक वाहने असून, या वर्षाअखेरीपर्यंत ई-वाहनांची संख्या ४० लाखांवर पोहचेल, तर पुढील दोन वर्षांत देशात तीन कोटी र्इव्ही असतील, अशी माहिती गडकरी यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60890 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top