
प्राणीप्रेमींच्या मदतीने श्वान पुन्हा धावू लागले
पुणे, ता. ६ ः वाहनाने दिलेल्या धडकेमुळे कंबरेखालील भाग लूळा झालेल्या सात वर्षांच्या श्वानावर (मादी) शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या झाली, त्यामुळे त्याला जीवनदान मिळाले. शहरातील प्राणीप्रेमींनी या शस्त्रक्रियेसाठी लागणारा मदतनिधी गोळा केला असून, नुकतीच या श्वानाच्या पाठीच्या कण्याची शस्त्रक्रिया आणि फिजिओथेरपी पार पडली.
अपघात झालेल्या या श्वानाचे नाव सिमरन आहे. बांधकाम व्यावसायिक आणि प्राणीप्रेमी अमर तलरेजा यांनी जखमी अवस्थेत सिमरनला पाहिले व तिला शुद्धीत आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, मागच्या दोन्ही पायांच्या अर्धांगवायूमुळे तिला हालचाल करता येत नव्हती, तरीसुद्धा तिचा जीव वाचविण्याचा निर्धार केला आणि त्यांनी त्वरित स्मॉल अॅनिमल क्लिनिकचे पशुवैद्यकीय सर्जन डॉ. नरेंद्र परदेशी यांच्याशी संपर्क साधला. डॉ. परदेशी यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांच्या गटाने सिमरनची शस्त्रक्रिया केली असून, त्यांनी तिला पुन्हा तिच्या पायावर उभे राहण्यास मदत केली, असे तलरेजा यांनी सांगितले.
अपघातात झालेल्या दुखापतीमुळे सिमरनच्या पाठीचा कणा खराब झाला होता. शस्त्रक्रियेमुळे मागच्या पायातील अर्धांगवायू कमी करत पाठीच्या दुखापतीमध्ये सुधारणा दिसून येते. ही प्रक्रिया सुमारे तीन तास चालली आणि त्याच दिवशी तिला घरी सोडण्यात आले. मात्र, शस्त्रक्रियेनंतर सुमारे एक महिना तिला प्लॅस्टर लावून ठेवले. सध्या, सिमरन चालण्यास सक्षम आहे.
- डॉ. नरेंद्र परदेशी, पशुवैद्यकीय सर्जन
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60892 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..