महत्त्वाच्या पदांवर तरुणांना संधी द्या ः पी. चिदंबरम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महत्त्वाच्या पदांवर तरुणांना संधी द्या ः  पी. चिदंबरम
महत्त्वाच्या पदांवर तरुणांना संधी द्या ः पी. चिदंबरम

महत्त्वाच्या पदांवर तरुणांना संधी द्या ः पी. चिदंबरम

sakal_logo
By

पुणे,ता. ६ : ‘पक्षात तरुण कार्यकर्ते दिसले पाहिजेत. पक्षाचा विचार तरुण हवा, कृती तरुण हवी, दिसणे आणि जिंकणेही तरुणांसारखेच असले पाहिजे. पक्षात महत्त्वाच्या पदावर तरुणांना संधी द्या,’ असा सल्ला माजी केंद्रीयमंत्री पी. चिदंबरम यांनी शुक्रवारी कॉंग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांना दिला.

पुण्यात विविध कार्यक्रमांसाठी आल्यानंतर चिदंबरम यांनी कॉंग्रेस भवनला सदिच्छा भेट दिली. त्यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार उल्हास पवार, मोहन जोशी, ॲड. अभय छाजेड आदी उपस्थित होते.

बूथ कमिटी, वॉर्ड कमिटी, तालुका कमिटी आणि ब्लॉक कमिटी महत्त्वाची आहे. ब्लॉक कमिटीशिवाय संघटनेची इमारत बांधणी होऊच शकत नाही, असे सांगून चिदंबरम म्हणाले, ‘‘तळागाळापासून संघटनेची पुनर्बांधणी आवश्‍यक आहे. संघटनेत ज्यांना घेणार ते संघटनेविषयी प्रामाणिक हवेत. आजकालच्या तरुणांचे शिक्षण चांगले झाले आहे, ते तंत्रज्ञान जाणणारे आहेत, हाताळणारे आहेत.’’
आताच्या पिढीला जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी माहीत नाहीत. सध्याच्या तरुणपिढीच्या जन्माच्या आधीच ते गेले आहेत. आताच्या सरकारने या सगळ्यांची नावे पाठ्यपुस्तकातूनही काढून टाकली आहे. त्यामुळे या नेत्यांविषयी या नव्या पिढीला सांगा, असेही चिदंबरम म्हणाले.
-----------

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60905 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top