विद्यापीठात भरली छोट्या व्यंगचित्रकारांची शाळा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यापीठात भरली छोट्या व्यंगचित्रकारांची शाळा!
विद्यापीठात भरली छोट्या व्यंगचित्रकारांची शाळा!

विद्यापीठात भरली छोट्या व्यंगचित्रकारांची शाळा!

sakal_logo
By

पुणे, ता. ६ : जागतिक व्यंगचित्रकार दिनानिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील व्यंगचित्र कला संग्रहालयाने कार्यशाळा, चित्रकला स्पर्धा व प्रदर्शन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करत हा दिवस साजरा केला. यावेळी विद्यापीठात लहान मुलांचीच शाळा भरली होती.
विद्यापीठाच्या मीडिया अँड कम्युनिकेशन स्टडीज विभागांतर्गत विभाग प्रमुख डॉ. माधवी रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाच्या व्यंगचित्रकला संग्रहालयात कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी आठ ते बारा वयोगटातील मुलांसाठी व्यंगचित्र कार्यशाळेचे आयोजन केले होते. व्यंगचित्रकार सूरज ‘एस्के’ श्रीराम यांनी मुलांना मार्गदर्शन केले. कार्यशाळेत २५ मुलांनी सहभाग घेतला. या सर्व मुलांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी मुलांनी आणि पालकांनी व्यंगचित्रकला संग्रहालयाची सहल अनुभवली.
जागतिक व्यंगचित्रकार दिनाचे औचित्य विद्यापीठासह पुणे, नाशिक आणि नगर येथील सर्व संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी व्यंगचित्रकला स्पर्धा आयोजित केली होती. नागरी समस्या, पर्यावरणीय प्रदूषण, हवामान बदल आणि राजकीय समस्या अशा विषयांवर सुमारे ११० प्रवेशांसह स्पर्धेला प्रतिसाद मिळाला, असे संग्रहालयाच्या क्युरेटर डॉ. प्रिया गोहाड यांनी सांगितले. या स्पर्धेत प्रथम : साक्षी शिंदे, द्वितीय : मोना ठाकरे, तृतीय : नेहा राठौर यांनी पारितोषिक पटकाविले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60908 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top