नगररोड, विमाननगर, येरवड्याचा वीजपुरवठा उद्या बंद राहणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नगररोड, विमाननगर, येरवड्याचा वीजपुरवठा उद्या बंद राहणार
नगररोड, विमाननगर, येरवड्याचा वीजपुरवठा उद्या बंद राहणार

नगररोड, विमाननगर, येरवड्याचा वीजपुरवठा उद्या बंद राहणार

sakal_logo
By

पुणे, ता. ६ : ‘महापारेषण’च्या खराडी ते थेऊर या १३२ केव्ही अतिउच्चदाब टॉवरलाइनच्या दुरुस्तीसाठी नगररोड, विमाननगर, कल्याणीनगर व येरवडा या परिसराचा वीजपुरवठा रविवारी (ता. ८) पहाटे चार ते सहा वाजल्यादरम्यान बंद राहणार आहे. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी हे काम पहाटेच्या सुमारास दोन तासांत पूर्ण करण्यात येणार आहे, असे महापारेषणकडून सांगण्यात आले.

महापारेषण कंपनीच्या थेऊर ते खराडी आणि लोणीकंद ते खराडी या टॉवरलाइनचे जम्प बदलण्याचे काम प्रस्तावित आहे. हे काम तातडीचे व अत्यावश्यक असल्याने पूर्वनियोजन करून रविवारी पहाटे दोन तासांत ते पूर्ण करण्यात येणार आहे. या तांत्रिक कामामुळे खराडी अतिउच्चदाब उपकेंद्रातून होणाऱ्या महावितरणच्या २२ केव्ही क्षमतेच्या १९ वाहिन्यांचा वीजपुरवठा बंद राहणार आहे. महावितरणकडून १९ पैकी ११ वाहिन्यांचा वीजपुरवठा महापारेषणच्या मगरपट्टा, थेऊर, व्हीएसएनएल या अतिउच्चदाब उपकेंद्राद्वारे पर्यायी स्वरूपात सुरू ठेवण्यात येणार आहे. तथापि, विजेचे भारव्यवस्थापन शक्य न झाल्यास काही वीजवाहिन्यांचा पुरवठा पहाटे दोन तास बंद ठेवावा लागणार आहे. या परिसरातील वीजग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर याबाबत ‘एसएमएस’द्वारे माहिती देण्यात येणार आहे, असे महावितरणकडून सांगण्यात आले.

...या भागात वीज नसेल
गांधीनगर, यशवंतनगर, गणेशनगर, जयप्रकाशनगर, लक्ष्मीनगर, भाटनगर, सुभाषनगर, नवी खडकी, येरवडा गाव, रामनगर, महाराष्ट्र हाउसिंग सोसायटी, पीडब्ल्यूडी वसाहत, त्रिदलनगर, नागपूर चाळ, सह्याद्री हॉस्पिटल परिसर, विमाननगर, रोहन मिथिला सोसायटी, साकोरेनगर, राजीवनगर नॉर्थ व साऊथ, गणपती मंदिर चौक, दत्त मंदिर चौक, श्रीकृष्ण हॉटेल, फिनिक्स चौक, श्रीरामनगर, पारेशरनगर, फॉरेस्ट पार्क, खुळेवाडी, खांदवेनगर, विमानतळ रोड, रामवाडी गावठाण, चंदननगर, संघर्ष चौक, प्रीतनगर, अष्टविनायक नगर, पद्मय्या सोसायटी, बोराटेवस्ती, यशवंतनगर, तुकारामनगर, गणपती हाउसिंग सोसायटी, शेजवळ पार्क, साई पार्क, वृंदावन कॉलनी, म्हाडा कॉलनी या परिसरातील वीजपुरवठा पहाटे चार ते सहा या दरम्यान बंद राहणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60912 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top