
लैंगिक अत्याचार करणाऱ्याला दहा वर्षे सक्तमजुरी
पुणे, ता. ६ : अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्याला न्यायालयाने दहा वर्षे सक्तमजुरी आणि पंचवीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. विशेष न्यायाधीश ए. व्ही. रोट्टे यांनी हा निकाल दिला.
दिलीप रामचंद्र गुरधाळकर (वय ३५, रा. मुंढवा) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. त्याने दंड न भरल्यास सहा महिन्यांचा अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने निकालपत्रात म्हटले आहे.
मुलीच्या आर्इने याबाबत मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. ही घटना पाच मे २०१७ रोजी मुंढवा परिसरात घडली. गुरधाळकर याने मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले. त्यानंतर तिला विविध ठिकाणी नेत जबरदस्तीने वारंवार शारीरिक संबंध ठेवले, असे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र सादर केले. त्यामध्ये आरोपीविरोधात अपहरण, बलात्कार आणि लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायद्याच्या (पॉक्सो) विविध कलमांन्वये आरोप ठेवण्यात आले होते. या खटल्यात विशेष सरकारी वकील जावेद खान यांनी सरकार पक्षातर्फे काम पाहिले. त्यांनी एकूण सात साक्षीदार तपासले. आरोपीला अधिकाधिक कठोर शिक्षा द्यावी, असा युक्तिवाद ॲड. खान यांनी केला.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60932 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..