आता महाविद्यालयांत मिळणार वाहन परवाना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आता महाविद्यालयांत मिळणार वाहन परवाना
आता महाविद्यालयांत मिळणार वाहन परवाना

आता महाविद्यालयांत मिळणार वाहन परवाना

sakal_logo
By

आता महाविद्यालयांत मिळणार वाहन परवाना

पुणे, ता. ६ ः लवकरच पुण्यातील विविध महाविद्यालयांत विद्यार्थांना वाहन चालविण्याचा परवाना मिळणार आहे. आरटीओ प्रशासन महाविद्यालयांत शिबिर आयोजित करणार आहे. त्या संबंधीच्या सूचनादेखील परिवहन आयुक्तांकडून प्राप्त झाल्या असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे यांनी सांगितले.

प्रादेशिक परिवहन कार्यालय, इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स, पुणे लोकल सेंटर तसेच सोसायटी ऑफ ऑटोमोबाईजल इंजिनिअर्स (इंडिया) यांच्या वतीने ‘वाहनचालक कौशल्य विकास व रस्ता सुरक्षा’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी डॉ. शिंदे बोलत होते.

कार्यशाळेचे उद्‍घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते झाले. यावेळी यशदाचे डॉ. सुनील धापटे, लोकसत्ताचे संपादक मुकुंद संगोराम, उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. नितीन करमळकर म्हणाले की, वाहनचालक कौशल्य विकास व रस्ता सुरक्षा हा विषय पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केला जाणार आहे. क्रेडीट बेसच्या माध्यमातून रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असणारे, मनुष्यबळाची क्षमता वाढविण्याकरिता रोड सेफ्टी ऑडिट व्हेईकल डायनॅमिक्स व एमएसडब्लूसारख्या कोर्सेसच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे.

कार्यशाळेस सेव्ह लाइफ फाउंडेशन, बालभारती, सेफ किड्स फाउंडेशन, आयडीटीआर, लोकमान्य फाउंडेशन, गुड समर्टीयन्स, युएनएम फाउंडेशन, तसेच गौरांग मोटार ड्रायव्हिंग स्कूल यांच्या पदाधिकाऱ्यांनी रस्ता सुरक्षेच्या विविध विषयांवर सादरीकरण केले.
------------------------

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60937 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top