राज्यात उन्हाचा चटका कायम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यात उन्हाचा चटका कायम
राज्यात उन्हाचा चटका कायम

राज्यात उन्हाचा चटका कायम

sakal_logo
By

पुणे, ता. ६ ः राज्यात हवामान कोरडे झाले असून कमाल तापमानातील चढ-उतार कायम आहे. पुढील चार दिवस ही स्थिती अशीच राहणार असून उन्हाचा चटका कायम राहणार असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
विदर्भात उन्हाचा चटका वाढत आहे. राज्यात शुक्रवारी सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद विदर्भात ब्रम्हपुरी येथे ४५.२ अंश सेल्सिअस झाली. तर नीचांकी तापमान पुण्यात १९.९ अंश सेल्सिअस नोंदले गेले. विदर्भात काही तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात किंचित वाढ झाली होती. राज्यात सध्या हवामान कोरडे राहणार असून येत्या रविवारपासून (ता. ८) तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. यातच मध्यप्रदेश आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. त्यापासून विदर्भ, तेलंगण, रायलसीमा, तमिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचे संकेत ः
बंगालचा उपसागरात दक्षिण अंदमान समुद्राजवळ असलेल्या चक्राकार वाऱ्याच्या प्रभावामुळे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. या प्रणालीची तीव्रता वाढून रविवारी (ता. ८) सायंकाळपर्यंत उपसागरात चक्रीवादळाची निर्मिती होण्याची शक्यता आहे. मंगळवारपर्यंत (ता. १०) ही वादळी प्रणाली उत्तर आंध्र प्रदेश, ओडिशाच्या किनाऱ्याकडे येण्याची चिन्हे आहेत. परिणामी अंदमान निकोबार बेटसमूह आणि ओडिशाच्या किनाऱ्यावर जोरदार वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे. पूर्व किनारपट्टीकडे येताना वाऱ्याचा वेग आणखी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.

येथे तापमान अधिक
ब्रम्हपुरी ः ४५.२
नागपूर ः ४३.७
अकोला ः ४३.७
अमरावती ः ४३.८
परभणी ः ४२.८
सोलापूर ः ४२.६

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60940 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top