
नागरिकांना मिळाल्या व्यवसायाच्या संधींची माहिती
पुणे, ता. ६ : फ्रँचाईज व्यवसाय नेमका असतो काय? तो कसा चालवायचा? त्यातील फायदे तोटे काय आहेत? यासह कोणत्याही व्यवसायाच्या स्थापनेपासून त्यांच्या शेवटपर्यंतचा प्रवास कसा होतो, याची माहिती फ्रँचाईज व इतर व्यवसायांत यशस्वी झालेल्या व्यावसायिकांनी ‘जीतो कनेक्ट : २०२२’मध्ये सहभागी झालेल्यांना दिली.
मार्केटयार्ड येथे आयोजित केलेल्या सोहळ्यात खुलजा सिम सिम (वेलकम टु अनलिमिटेड बिझनेस अपॉर्च्युनिटीज) या विषयावर मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले होते. ‘पी. ओस्तवाल ग्रुप’चे पारस ओस्तवाल, ‘सुहाना’च्या दिग्गी दोराबजी, ‘इंडिया शॉपी टॉड कॉम’चे राजेश मेहता, ‘इपॅक’चे निखिल बोथरा, ‘हल्दीराम’चे अमोल रामटेके, ‘वारे’चे अंकित दोशी यांनी व्यवसायाबाबतच्या टिप्स उपस्थितांना दिल्या.
ओस्तवाल म्हणाले, ‘‘फ्रँचाईज व्यवसाय करायचा असेल, तर किमान पाच दुकाने सुरू करा. फ्रँचाईजमध्ये काम केले तर अशी सिस्टीम सेट करायची की प्रत्येक वेळी आपल्याला शॉपमध्ये जावे लागणार नाही.’’ रिटेल कंपन्या तसेच फ्रँचाईज कशा करायच्या याची माहिती त्यांनी दिली. तसेच या व्यवसायात कसे यशस्वी होईल याचे अनुभव सांगितले. दोराबजी यांनी सुहानाचा प्रवास मांडला. व्यवसायत कोणत्या अडचणी येवू शकता व त्यावर कशी मात करायची याबाबत त्यांनी माहिती दिली. बोथरा, रामटेके आणि दोशी यांनी देखील त्यांच्या कंपन्यांची माहिती देत त्यांचा प्रवास मांडला. रेश्मा भंडारी व चेतन जैन यांनी सूत्रसंचालन केले.
मार्गदर्शकांनी दिलेल्या टिप्स :
- दुकानात नीटनेटकेपणा हवा
- काम करीत असताना जास्त ताण येणार नाही याचे नियोजन करावे
- यशस्वी होण्यासाठी व्यवसाय सुरू केल्यानंतर काही दिवस वाट पहावी
- फ्रँचाईजला प्राधान्य द्यावे
मार्केटयार्ड : ‘खुलजा सिम सिम’ या चर्चासत्रात मार्गदर्शन करताना दिग्गी दोराबजी.
62478
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60941 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..