
कॅफे चालक आरटीओच्या रडारवर
पुणे, ता. ६ ः शिकाऊ वाहन परवान्यासाठी आता आरटीओ कार्यालयात जाण्याची व टेस्ट देण्याची गरज नाही. ‘तुम्ही फक्त फोटो व आधारकार्ड घेऊन या आणि लायसन्स घेऊन जा’ अशा पद्धतीची जाहिरात करणाऱ्या कॅफे चालक व मोटार ड्रायव्हिंग स्कूलची पाहणी करावी असा आदेश परिवहन आयुक्तांनी दिला आहे. अशा ठिकाणी जर नियमांचे पालन न करता शिकाऊ परवाना दिला जात असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा देखील परिवहन विभागाने दिला आहे.
गेल्या काही दिवसांपासून पुणे तसेच अन्य परिसरात ऑनलाइन परवाना काढताना मोठ्या गैरवापर होत आहे. या संदर्भात तक्रारी प्राप्त झाल्यानंतर परिवहन विभागाने हा आदेश काढला आहे. राज्यातील सर्व प्रादेशिक व उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना या विषयीचे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे मोटार ड्रायव्हिंग स्कूल व रस्ता सुरक्षाचे नियम न सांगता लायसन्स काढून देणाऱ्या कॅफे चालक आता आरटीओच्या रडारवर आले आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60954 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..