मिलिंद एकबोटेंसह २० जणांवर गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मिलिंद एकबोटेंसह २० जणांवर गुन्हा
मिलिंद एकबोटेंसह २० जणांवर गुन्हा

मिलिंद एकबोटेंसह २० जणांवर गुन्हा

sakal_logo
By

पुणे, ता. ६ : कसबा पेठेतील पुण्येश्वर मंदिराजवळ पत्रकाचे वाटप करून धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांच्यासह २० जणांवर फरासखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणात मिलिंद एकबोटे व नंदकिशोर रमाकांत एकबोटे यांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर करताना शहरात (महापालिका हद्दीत) येण्यास आरोपपत्र दाखल करेपर्यंत बंदी घातली आहे. या अटीशर्ती शिथिल करण्यासाठी न्यायालयात धाव घेतल्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीश शरयू सहारे यांनी त्यांचा अर्ज फेटाळून लावला आहे. याप्रकरणी मिलिंद एकबोटे, नंदकिशोर एकबोटे, सुनील तांबट, स्वप्नील नाईक, मुकुंद पाटोळे, वैभव वाघ यांच्यासह २० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60962 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top