महिलेच्या विनयभंगप्रकरणी तरुणांना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महिलेच्या विनयभंगप्रकरणी तरुणांना अटक
महिलेच्या विनयभंगप्रकरणी तरुणांना अटक

महिलेच्या विनयभंगप्रकरणी तरुणांना अटक

sakal_logo
By

पुणे, ता. ६ ः मॅरेथॉनमध्ये धावणाऱ्या महिलेशी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी अश्लील वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला होता. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत चंदननगर पोलिसांनी दोन उच्चशिक्षित तरुणांना बेड्या ठोकल्या. ही घटना रविवारी (ता. १) खराडी परिसरात घडली.
परिमल जोशी (वय २८, रा.चंदन नगर, मुळ रा. माजलगाव, बीड), निखिल पाटील (वय२९, रा.चंदन नगर, मुळ रा.चोपडा, जळगाव), अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी एका ४२ वर्षीय महिलेने फिर्याद दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला संगणक अभियंता आहे. महिला खराडी येथे एक मे रोजी सकाळी सात वाजता आयोजित केलेल्या एका मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी झाली होती. महिला खराडी परिसरातील गेरा इम्पेरियम अल्फा या इमारतीसमोरून धावत असतानाच दुचाकीवरून आलेल्या दोघांनी महिलेशी अश्लील वर्तन केले. त्यानंतर ते तेथून पळून गेले. त्यानंतर महिलेने फिर्याद दिली. घटनेची माहिती गांभीर्याने दखल घेऊन चंदन नगरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील जाधव, पोलिस निरीक्षक (गुन्हे) सुनील थोपटे यांनी घटनास्थळाची पाहणी करून सीसीटीव्ही तपासले. त्यावेळी एका सीसीटीव्हीमध्ये संबंधित दुचाकीचा क्रमांक मिळाला. त्यावरुन पोलिसांनी दुचाकीचा माग काढला. दुचाकीस्वार राहात असलेल्या वसतिगृहातून एकास ताब्यात घेतले. तेव्हा त्यांची ओळख पटली. त्यांनीच गुन्हा केल्याची कबुली दिली.

परिमल जोशी हा एका नामांकित बॅंकेत नोकरीला आहे, तर निखिल पाटील हा अभियंता आहे. दोघेही एकाच वसतिगृहात राहतात. घटनेच्या अगोदरच्या रात्री दोघांनी मद्यपान केले होते. त्यानंतर सकाळी सिगारेट ओढण्यासाठी ते बाहेर आले. दुचाकीवरून जात असतानाच त्यांनी महिलेचा विनयभंग केला. याच पद्धतीने अन्य काही महिलांशीही त्यांनी असाच प्रकार केला असल्याची माहिती पुढे आली आहे.
------------------------

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60973 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top