मारहाणप्रकरणी तिघांना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मारहाणप्रकरणी तिघांना अटक
मारहाणप्रकरणी तिघांना अटक

मारहाणप्रकरणी तिघांना अटक

sakal_logo
By

पुणे, ता. ७ ः किरकोळ वादातून तिघांनी सायकलस्वार तरुणाला बांबूने मारहाण करीत त्याच्यावर कोयत्याने वार केले. याप्रकरणी खडक पोलिसांनी दुचाकीस्वारासह तिघांना अटक केली. ही घटना गुरुवार पेठेतील कस्तुरे चौकात घडली. ऋतुराज दत्तात्रेय क्षीरसागर (वय १९), नीलेश शिवलाल बिरादार (वय १९), आशुतोष अनिल वाघमारे (वय १९, तिघे रा. महात्मा फुले पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्या एका अल्पवयीन साथीदारालाही ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी शुभम राजेंद्र मायने (वय २४, रा. महात्मा फुले पेठ) याने खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी मायने हा गंभीर जखमी असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c61039 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top