गुरव, मराठे, खंडाळकर यांना ‘युवा गौरव पुरस्कार’ प्रदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुरव, मराठे, खंडाळकर यांना ‘युवा गौरव पुरस्कार’ प्रदान
गुरव, मराठे, खंडाळकर यांना ‘युवा गौरव पुरस्कार’ प्रदान

गुरव, मराठे, खंडाळकर यांना ‘युवा गौरव पुरस्कार’ प्रदान

sakal_logo
By

पुणे, ता. ७ : भारतीय संगीत प्रसारक मंडळाचे गांधर्व महाविद्यालय गेल्या ९० वर्षांपासून पुढील पिढी घडविण्याचे काम करीत आहे. हा वारसा जतन करण्यामध्ये समर्पित गुरूंचे योगदान मोलाचे आहे, असे मत ‘एमकेसीएल’चे संचालक विवेक सावंत यांनी व्यक्त केले.
भारतीय संगीत प्रसारक मंडळाच्या गांधर्व महाविद्यालयाच्या ९० वर्ष पूर्तीनिमित्त आयोजित कै.पं. विष्णू दिगंबर पलुस्कर, कै.पं.विनायकबुवा पटवर्धन आणि कै.पं. दत्तात्रेय विष्णू पलुस्कर स्मृती संगीत समारोहात युवा संगीत सभेअंतर्गत प्रणव गुरव, रोहित मराठे आणि सुरंजन खंडाळकर या तीन कलाकारांना सावंत यांच्या हस्ते ‘युवा गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
भारतीय संगीत प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ.रामचंद्र देखणे, गांधर्व महाविद्यालयाचे प्राचार्य ज्येष्ठ हार्मोनिअम वादक पं. प्रमोद मराठे, भारतीय संगीत प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष रवींद्र आपटे आणि मोहन उचगांवकर या वेळी उपस्थित होते.
सावंत म्हणाले, आज भारतीय शास्त्रीय संगीत पाश्चात्त्य देशात स्थिरावले आहे, ही त्या शास्त्राची ताकद आहे. प्रणव गुरव, रोहित मराठे आणि सुरंजन खंडाळकर यांचे एकल तबला वादन, हार्मोनिअम वादन आणि गायन झाले. सूत्रसंचालन स्वानंद पटवर्धन यांनी केले.

--------
62596

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c61057 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top