घरफोडीतील चोरटे जेरबंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घरफोडीतील चोरटे जेरबंद
घरफोडीतील चोरटे जेरबंद

घरफोडीतील चोरटे जेरबंद

sakal_logo
By

पुणे, ता. ७ ः घरफोडी करून पळून जाणाऱ्या चोरट्याला गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने पाठलाग करून पकडले. चोरट्याने विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीचे सात गुन्हे केले असून पोलिसांनी त्याच्याकडून साडे नऊ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गोरख विलास धांडे (वय २२, रा. गोकुळनगर, कात्रज कोंढवा रस्ता) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत २७ एप्रिल रोजी घरफोडीची घटना घडली होती. त्यामध्ये मोबाईल, सोने-चांदीचे दागिने चोरून नेले होते. या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाकडून करण्यात येत होता. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. दरम्यान संबंधित गुन्ह्यातील संशयित हा आपल्या साथीदारासह कात्रज तलावाजवळ येणार असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी तलाव परिसरात सापळा लावला व अटक केली.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c61061 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top