अभिनेता सोनू सूद : सामाजिक बांधिलकीतून आनंद चित्रपटसृष्टी आता खुजी वाटते | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अभिनेता सोनू सूद : सामाजिक बांधिलकीतून आनंद 
चित्रपटसृष्टी आता खुजी वाटते
अभिनेता सोनू सूद : सामाजिक बांधिलकीतून आनंद चित्रपटसृष्टी आता खुजी वाटते

अभिनेता सोनू सूद : सामाजिक बांधिलकीतून आनंद चित्रपटसृष्टी आता खुजी वाटते

sakal_logo
By

पुणे, ता. ७ : कोरोनानंतर तुमच्या आयुष्यात काय बदल झाला, असा प्रश्न सूत्रसंचालकाने विचारल्यावर अभिनेता सोनू सूद यांनी उत्तर दिले, ‘‘मला आता चित्रपटसृष्टी खुजी वाटतीये. सामान्य माणसाशी जोडण्याचा आनंद सर्वाधिक आहे.’’

‘जीतो कनेक्ट’च्या दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमांचा प्रारंभ करताना सूद यांनी हे मत व्यक्त केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. एन. एस.उमराणी, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे, जीतोचे अध्यक्ष अनिल जैन, जीतो पुणे चाप्टरचे अध्यक्ष ओमप्रकाश रांका, जीतो अपेक्सचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विजय भंडारी, जीतो अपेक्सचे अध्यक्ष सुरेश मुथा आदी उपस्थित होते. कोरोनानंतरचा बदल अधोरेखित करताना सूद म्हणाले,‘‘इथे लाइट नाही, कॅमेरा नाही फक्त ‘ॲक्शन’ आहे. समाजसेवा हे माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा चरित्र अभिनय आहे.’’

रांका यांनी कोरोना काळात केलेल्या विविध सेवाकार्यांचा आढावा घेतला. ते म्हणाले, ‘‘जीतो पुणे चाप्टरचे स्वतःचे कार्यालय लवकरच उभे राहत आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठी आम्ही वसतिगृह बांधत आहे.’’ उद्योगक्षेत्रातील नव्या बदलांसाठी अशा समिटची आवश्यकता असल्याचे मत डॉ. उमराणी यांनी व्यक्त केले.

सोनू सूद म्हणाले...
- समाजसेवा करण्याची प्रेरणा माझ्या आईकडून
- कोरोनाकाळात पहिले सहकार्य जैन समूदायाकडून लाभले
- घरी परतणाऱ्या प्रत्येक चेहऱ्यावरील हास्य माझ्यासाठी प्रेरणा
- लोकांची मदत करण्यासाठी श्रीमंत असणे गरजेचे नाही. फक्त काहीतरी करण्याची इच्छा हवी
- कोरोनाकाळात गरीब लोकही मदतीसाठी पुढे धावले
- दिवसातील एक-दोन तास समाजसेवेसाठी द्या

विविध प्लॅटफॉर्मचे अनावरण
कार्यक्रमात जीतोच्यावतीने विविध डिजिटल प्लॅटफॉर्म अथवा ॲपचे अनावरण करण्यात आले. जगभरातील जैन व्यावसायिकांना जोडणारे ऑनलाइन मार्केटप्लेस उपलब्ध करणारे ‘जे पॉईंट’चे अनावरण या वेळी करण्यात आले. यामध्ये डॉक्टरांपासून विविध व्यवसाय करणारे उद्योजकही जोडले गेले आहे. जीतोतर्फे जगभरात चालविले जाणारे उपक्रम, कार्यक्रम, सेवाकार्य आणि व्यवसायांची एका क्लिकवर माहिती देणाऱ्या जीतो वर्ल्ड ॲपचेही यावेळी उद्घाटन करण्यात आले.

B07822

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c61099 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top