स्मार्ट फोनने बदलले ‘जीवन’! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Smart Phone
स्मार्ट फोनने बदलले ‘जीवन’!

स्मार्ट फोनने बदलले ‘जीवन’!

- अमोल अवचिते

पुणे - स्मार्ट फोन (Smart Phone) हातात आला, त्यावेळी सेल्फी काढणे आणि ते सोशल माध्यमांवर (Social Media) प्रसिद्ध (Publicity) करणे, एवढेच माहिती होते. कालांतरांने विविध संकेतस्थळांवरील (Website) माहिती (Information) अभ्यासासाठी उपयुक्त ठरू शकते, याची प्रचिती आली. तसेच यू ट्युब चॅनेलच्या (Youtube Channels) माध्यमातून चांगले पैसे कमावता येऊ शकतात, असे मूळचा हिंगोलीचा पण सध्या पुण्यात राहणाऱ्या जीवन आघाव याने सांगितले.

विदर्भातील भाषेतील विनोदांचे व्हिडिओ तयार करून ते चॅनेलवर प्रसिद्ध केले. त्याला पाच लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्याने जाहिरातीच्या माध्यमातून पैसे मिळू लागले. त्यामुळे आवडीच्या क्षेत्रात करिअर घडविण्याचा निर्णय घेतल्याचे आघावने ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

इंजिनिअर होऊनही नोकरी मिळत नव्हती. त्यात स्पर्धा परीक्षांमध्ये चार वर्षे खर्ची झाली होती. कोणताही अनुभव पाठीशी नव्हता. त्यामुळे नोकरी मिळेल याची शक्यता धूसर होती. असे असले तरी रोजगार मिळविण्यासाठी काहीतरी काम करण्याची गरज होती. नोकरीच्या संधीची माहिती घेत होतो, त्याच वेळी ‘यू ट्युब चॅनेल’ आधार मिळाला.

विनोद, भाषा शैली, जाहिराती...

कॉलेज जीवनात विनोदाची तसेच वेगवेगळ्या आवाजांची नक्कल करण्याची आवड होती. त्याच आधारावर विदर्भातील भाषेच्या शैलीचा वापर करून व्हिडिओ डबिंग करण्यास सुरुवात केली. ‘ट्रंप तात्या’ नावाने चालविलेल्या व्हिडीओंना प्रसिद्धी मिळत गेली. लाखोंच्यावर फॉलोअर्सची संख्या गेली. त्यामुळे व्हिडिओ सुरू होण्यापूर्वी ज्या जाहिराती दाखवल्या जातात, त्यातून एक दिवस जाहिरातीपोटी पैसे खात्यावर जमा होऊ लागले. त्यानंतर हेच आपले रोजगार मिळविण्याचे क्षेत्र आहे, याची प्रचिती आली, असे जीवनने सांगितले.

असा झाला फायदा

  • स्पर्धा परीक्षा क्षेत्राशी तसेच विद्यार्थ्यांशी सतत संपर्क असल्याने या विद्यार्थ्यांचे मनोरंजन करावे, असा विचार केला

  • त्याप्रमाणे व्हिडिओ तयार केले

  • या क्षेत्राचे वास्तव ही समोर आले पाहिजे, असे वाटले

  • सध्य परिस्थिती, स्पर्धा परीक्षांचे वास्तव मांडण्याचा प्रयत्न

  • विविध विषयांवर चर्चासत्रांचे आयोजन

  • विद्यार्थ्यांचा सहभाग तसेच चॅनेलची प्रसिद्धी होण्यास मदत

  • परखड मते व्यक्त केल्याने अनेक विद्यार्थ्यांचा स्वतःमध्ये बदल

डिजिटल युगात प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. तोच आपले आयुष्य घडवू शकतो, हे मला उमगले आहे. याच मोबाईलच्या वापरातून स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. अशा प्रकारे प्रत्येकाला मोबाईल जगण्याची दिशा देऊ शकतो. फक्त काय पाहावे आणि काही पाहू नये, हे आपण ठरवायचे असते.

- जीवन आघाव

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c61104 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :puneLife5G Smart Phone
go to top