सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ: डॉ. करमळकर यांचा कार्यकाल दहा दिवसांनी संपणार कुलगुरू निवड प्रक्रिया रखडण्याची चिन्हे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ: डॉ. करमळकर यांचा कार्यकाल दहा दिवसांनी संपणार 
कुलगुरू निवड प्रक्रिया रखडण्याची चिन्हे
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ: डॉ. करमळकर यांचा कार्यकाल दहा दिवसांनी संपणार कुलगुरू निवड प्रक्रिया रखडण्याची चिन्हे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ: डॉ. करमळकर यांचा कार्यकाल दहा दिवसांनी संपणार कुलगुरू निवड प्रक्रिया रखडण्याची चिन्हे

sakal_logo
By

पुणे, ता. ७ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांचा कार्यकाल अवघ्या दहा दिवसांनी संपणार असून अद्यापही उच्च शिक्षण विभागाकडून कुलगुरू निवडीची प्रक्रिया सुरू झालेली नाही. त्यामुळे कुलगुरू निवडीची प्रक्रिया रखडण्याची चिन्हे असून प्रभारी कुलगुरू पदांची जबाबदारी कोणावर सोपविली जाणार याकडे शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यात सुधारणा करून राज्य सरकारने विद्यापीठांतील कुलगुरू निवडीसह अनेक अधिकार स्वत:कडे घेतले आहेत. या कायद्यात सुधारणा करणाऱ्या विधेयकाला हिवाळी अधिवेशनात मंजूर मिळाली आहे. कुलगुरू निवड समितीमध्ये शासनाच्या दोन सदस्यांचा समावेश करावा, याबाबत विद्यापीठ कायद्यात सुधारणा केली आहे. परंतु, या विधेयकावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अद्याप स्वाक्षरी केली नाही. त्यामुळे विद्यापीठ कुलगुरू निवड प्रक्रिया रखडण्याची चिन्हे दिसून येत आहेत.

नवीन कुलगुरूंसाठी प्रतीक्षा?
विद्यापीठाच्या कुलगुरूंचा कार्यकाल संपण्यापूर्वी तीन महिने आधी नव्या कुलगुरूंची निवड प्रक्रिया सुरू केली जाते. पुणे विद्यापीठाने सुद्धा कायद्यातील तरतुदीनुसार कुलगुरू निवड समितीसाठी एका सदस्याचे नाव निश्चित केले आहे. परंतु, उच्च शिक्षण विभागाकडून अद्याप कोणत्याही सकारात्मक हालचाली होत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंचा कार्यकाल संपत आला, तरीही अद्याप कुलगुरू निवड समिती स्थापन होऊ शकलेली नाही. त्यामुळे विद्यापीठाला नवे कुलगुरू मिळण्यासाठी आणखी काही महिने वाट पहावी लागणार आहे.

कुलगुरू पदाची जबाबदारी कोणाकडे?
राज्यातील विविध विद्यापीठांचे कुलगुरू सेवानिवृत्त झाले होते, त्यावेळी डॉ. करमळकर यांच्याकडे प्रभारी पदभार देण्यात आला होता. यानुसार कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठ आणि नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा प्रभारी पदभार डॉ. करमळकर यांच्याकडे सोपविण्यात आला होता. परंतु, आता डॉ. करमळकर हे येत्या १७ मे रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यानंतर त्यांचा रिक्त झालेला पदभार राज्यातील दुसऱ्या एखाद्या विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे दिला जाण्याची शक्यता आहे.


सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंचा कार्यकाल संपत आला आहे. हा कार्यकाल संपण्यापूर्वी तीन महिने आधीपासून कुलगुरू निवडीची प्रक्रिया सुरू होणे अपेक्षित होते. परंतु अद्याप कुलगुरू पदाचे अर्ज स्वीकारण्याची जाहिरात देखील प्रसिद्ध झाली नाही. त्यामुळे डॉ. करमळकर यांचा कार्यकाल संपल्यानंतर विद्यापीठासमोरील अडचणी वाढणार आहेत. त्यामुळे राज्य सरकारने सामंजस्यातून मार्ग काढणे आवश्यक आहे.
- डॉ. अरुण अडसूळ, माजी कुलगुरू

विद्यापीठ कायद्यात सुधारणा करणारे विधेयक हिवाळी अधिवेशनात मंजूर झाले असले, तरीही राज्यपालांनी त्याला अद्याप मंजुरी दिली नाही. त्यामुळे कुलगुरू निवड प्रक्रिया आधीच्या कायद्यानुसार करावी लागणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी किमान तीन-चार महिने लागणार आहेत. त्यामुळे शासनाने यातून लवकरात मार्ग काढावा आणि कुलगुरू निवड प्रक्रिया सुरू करावी.
- डॉ. गजानन एकबोटे, कार्याध्यक्ष, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c61111 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top