संस्थाचालक मंडळाच्या बैठकीमध्ये राज्यशासनाचा अभिनंदनाचा ठराव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संस्थाचालक मंडळाच्या बैठकीमध्ये राज्यशासनाचा अभिनंदनाचा ठराव
संस्थाचालक मंडळाच्या बैठकीमध्ये राज्यशासनाचा अभिनंदनाचा ठराव

संस्थाचालक मंडळाच्या बैठकीमध्ये राज्यशासनाचा अभिनंदनाचा ठराव

sakal_logo
By

पुणे, ता. ७ : शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या योजनांची पुनर्रचना करून त्यासाठी जिल्हा वार्षिक योजनांमध्ये ५ टक्के निधी राखीव ठेवण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यासाठी संस्थाचालक शिक्षण मंडळ पुणे ग्रामीण संस्थेच्या बैठकीत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडून अभिनंदनाचा ठराव करण्यात आला.
बैठकीस मंडळाचे अध्यक्ष विजय कोलते, संचालक प्राचार्य डॉ. प्रसन्नकुमार देशमुख, पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभाग शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड, उच्च शिक्षण उपसंचालक डॉ. किरणकुमार बोंदड, शिवाजी चाळक, प्रदीप वळसेपाटील, अनिल मेहर आदी उपस्थित होते.
यावेळी कोलते म्हणले, ‘‘शासनाच्या या निर्णयामुळे राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या दुरुस्त्या इमारती, स्वच्छतागृहे, वाचनालय, क्रीडांगण यांसारख्या सुविधांसाठी निधी उपलब्ध होणार आहे. जिल्हा नियोजन मंडळाचे वार्षिक अंदाजपत्रक ८०० कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याने दरवर्षी जिल्ह्यासाठी ४० कोटी रुपये उपलब्ध होईल.’’
जिल्ह्यातील सुमारे ८०० शाळांच्या स्वमान्यतेचे प्रस्ताव प्रलंबीत आहेत. यासाठी कार्यवाही सुरू असल्याचे यावेळी गायकवाड यांनी सांगितले. तर बोंदड यांनी २०१७ पर्यंतच्या महाविद्यालयातील प्राचार्य व प्राध्यापकांच्या रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c61174 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top