नवउद्योजकांमुळे ग्राहककेंद्रीत व्यवसाय वाढला ट्रॅडिशनल वर्सेस डिसरप्टीव्ह बिझनेस चर्चासत्रात तज्ज्ञांचे मत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नवउद्योजकांमुळे ग्राहककेंद्रीत व्यवसाय वाढला
ट्रॅडिशनल वर्सेस डिसरप्टीव्ह बिझनेस चर्चासत्रात तज्ज्ञांचे मत
नवउद्योजकांमुळे ग्राहककेंद्रीत व्यवसाय वाढला ट्रॅडिशनल वर्सेस डिसरप्टीव्ह बिझनेस चर्चासत्रात तज्ज्ञांचे मत

नवउद्योजकांमुळे ग्राहककेंद्रीत व्यवसाय वाढला ट्रॅडिशनल वर्सेस डिसरप्टीव्ह बिझनेस चर्चासत्रात तज्ज्ञांचे मत

sakal_logo
By

पुणे, ता. ७ : सातत्याने नवे काही करणे हा उद्योगांचा स्थायी भाव आहे. नवीन कल्पना घेऊन येणारे नवउद्योजक मोठी कलाटणी देत आहे. तंत्रज्ञानस्नेही असलेले हे नव उद्योग अधिक ग्राहककेंद्रीत आहे, असे मत ‘जीतो कनेक्ट’मध्ये आयोजित ‘ट्रॅडिशनल वर्सेस डिसरप्टीव्ह बिझनेस’ चर्चासत्रात तज्ज्ञांनी व्यक्त केले.

डॉ. रेड्डीज लॅबरोटरीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक सप्रा, पिनॅकल इंडस्ट्रीजचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर मेहता, फार्मइझीचे सहसंस्थापक सिद्धार्थ शहा, चलोचे सहसंस्थापक मोहित दुबे हे या चर्चासत्रात सहभागी झाले होते. भारतात प्रचंड लोकसंख्या आहे आणि त्या सगळ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी एक मोठी नेटवर्किंग सिस्टिम देखील उभी राहिली आहे. फक्त तुम्ही लोकपर्यंत कसे पोहोचतात यावर तुमच्या व्यवसायाचे यशापयश अवलंबून आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या देशात तुम्ही कुठलीही नवीन आणि भन्नाट अशी बिझनेस कल्पना घेऊन आलात, तर त्यासाठी भारत हा देश नंदनवनच आहे, असे मतही तज्ज्ञांनी व्यक्त केले.
उद्योजक सिद्धार्थ शहा म्हणाले, ‘‘दर पाच वर्षांनी तुमची कुठलीही नवी कल्पना जुनी होते. त्यामुळे मार्केटमध्ये आलेली नवीन कल्पना तुम्ही समजून घ्या अन्यथा त्यापेक्षा उत्तम अशी नवीन कल्पना घेऊन या, तरच तुम्ही तुमच्या क्षेत्रात टिकून राहाल. सोबतच कुठल्याही उद्योगाच्या सुरुवातीला त्याच्या ग्राउंडवर काय मागणी आहे, हे जरूर तपासा त्यातून तुमचा उद्योग बहरत जाईल. ’’
सूत्रसंचालन जिनेंद्र भंडारी यांनी केले. ‘ट्रॅडिशनल वर्सस डिसरप्टीव्ह बिझनेस’ असा कुठलाही फरक नसून ‘बिझनेस इज ओन्ली बिझनेस’ अशीच आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c61186 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top