पुणे-नगर ‘इ एसटी’चा नवा अध्याय! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे-नगर ‘इ एसटी’चा नवा अध्याय!
पुणे-नगर ‘इ एसटी’चा नवा अध्याय!

पुणे-नगर ‘इ एसटी’चा नवा अध्याय!

sakal_logo
By

पुणे, ता. ७ : राज्य परिवहन महामंडळाचे पुण्यात सुरु असलेले चार्जिंग स्टेशनचे काम अंतिम टप्यात आहे. मे अखेरीस उर्वरित काम पूर्ण करून १ जूनपासून पुणे-नगर मार्गावर पहिली इ एसटी म्हणजे ‘शिवाई’ सुरु करण्याचे नियोजन महामंडळाने केले आहे. इ बससाठी पुणे हे राज्याचे बेस स्टेशन असेल. पुण्याहून तब्बल १५० इ बस राज्याच्या विविध शहरांत धावणार आहे. पुण्यातले चार्जिंग स्टेशनमध्ये ३० चार्जर असल्याने एकाच वेळी ३० बसचे चार्जिंग होईल.
एसटी प्रशासन डिझेलवरील गाड्या बंद करून सीएनजी व इलेक्ट्रिक वर धावणाऱ्या बसचा वापर करणार आहे. एक हजार इ बसचे नियोजन आहे. पहिल्या टप्प्यात १५० बस धावतील. ‘शिवाई’ या बसचे नाव आहे. संपूर्ण वातानुकूलित असून शिवशाहीच्या तुलनेने ‘शिवाई’चे तिकीट दर कमी ठेवण्याचे प्रयत्न असेल. त्यामुळे सामान्य प्रवाशांना देखील शिवाईने प्रवास करणे शक्य होणार आहे.

स्मरण इतिहासाचे
१ जून १९५२ रोजी राज्यात पहिली एसटी नगर-पुणे अशी धावली. त्याचे औचित्य साधून एसटी प्रशासनाने १ जून २०२२ रोजी पुणे-नगर अशी इ एसटी सोडण्याचे नियोजन केले. नगरमध्ये चार्जिंग स्टेशन नसल्याने पुण्याहून नगरसाठी एसटी धावेल. त्यामुळे ७० वर्षांनंतर आता एसटीमध्ये इ बसच्या रूपाने नवीन अध्याय सुरु होत आहे.

कसे आहे चार्जिंग स्टेशन
विभाग नियंत्रक कार्यालयाच्या पाठीमागील मोकळ्या जागेत चार्जिंग स्टेशन उभारले जात आहे. ८५ टक्के काम पूर्ण झाले. ३०० किलोवॅट क्षमतेच्या या चार्जिंग स्टेशनमध्ये ३० चार्जर आहेत. यात १५० व ९० किलोवॉटचा चार्जरचा समावेश आहे. एक बस चार्ज करण्यासाठी सुमारे दीड ते दोन तासाचा वेळ लागतो. बस चार्ज झाल्यावर सुमारे ३०० किलोमीटरपर्यंत धावेल. घोरपडी व गुलटेकडी या सबस्टेशनपासून चार्जिंग स्टेशनला वीज पुरवठा होणार आहे. चार्जिंग स्टेशनसाठी पाच कोटी रुपयांचा खर्च झाला आहे.

कोणत्या मार्गावर पुण्याहून बस सेवा
पुण्यासह सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद, नागपूर व नांदेड शहरांत एसटीचे चार्जिंग स्टेशन असतील. तसेच पुणे-सोलापूर, पुणे-नाशिक, पुणे-कोल्हापूर, पुणे-महाबळेश्वर, पुणे-औरंगाबाद या प्रमुख शहरांसाठी पुण्याहून एसटी धावणार आहे.

पुण्यातील चार्जिंग स्टेशनचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. एक जूनपासून पुणे-नगर मार्गावर पहिली इ बस सोडण्याचे नियोजन आहे. त्यादृष्टीने कामे पूर्ण केली जात आहे. पुण्याहून १५० इ बस धावणार आहेत.
- शेखर चन्ने, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, राज्य परिवहन महामंडळ, मुंबई

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c61205 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top