एमपीएससी परीक्षा ः आठ प्रश्न रद्द, तीन प्रश्नांची उत्तरे बदलण्याची वेळ न्यायालयात जाण्याचा विद्यार्थ्यांचा इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एमपीएससी परीक्षा ः आठ प्रश्न रद्द, तीन प्रश्नांची उत्तरे बदलण्याची वेळ
न्यायालयात जाण्याचा विद्यार्थ्यांचा इशारा
एमपीएससी परीक्षा ः आठ प्रश्न रद्द, तीन प्रश्नांची उत्तरे बदलण्याची वेळ न्यायालयात जाण्याचा विद्यार्थ्यांचा इशारा

एमपीएससी परीक्षा ः आठ प्रश्न रद्द, तीन प्रश्नांची उत्तरे बदलण्याची वेळ न्यायालयात जाण्याचा विद्यार्थ्यांचा इशारा

sakal_logo
By

पुणे, ता. ७ ः महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) संयुक्त गट ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२१ या पूर्व परीक्षेतील आठ प्रश्न रद्द केले आहेत. तर तीन प्रश्नांची उत्तरे बदलली आहेत. यामुळे विद्यार्थ्यी ‘एमपीएससी’वर संतापले असून न्यायालयात जाण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
एमपीएससीने ज्याप्रकारे कार्यपद्धतीत वेग धारण केला आहे. त्याचे कौतुक होत असतानाच दुसरीकडे एमपीएससीचे परीक्षेतील प्रश्न रद्द करण्याचा वेग मात्र कायम ठेवला आहे. एमपीएससीचा असाच कारभार सुरू राहिला तर प्रत्येक वेळी विद्यार्थ्यांना न्यायालयात धाव घेणे आवश्यक झाले आहे काय? असा प्रश्न या निमित्ताने निर्माण होत आहे. पहिल्या उत्तरतालीकेनुसार ५२ गुण मिळाले होते. आता ८ प्रश्न रद्द आणि तीन उत्तरे बदलल्याने ९ गुण कमी झाले आहेत. मुख्य परीक्षेला पात्र होईल का नाही, या तणावात आलो आहे. २०२० च्या परीक्षेत ही असेच झाले आहे. प्रत्येक परीक्षेला जर असे प्रश्न रद्द होणार असतील तर विद्यार्थ्यांनी काय करणे आपेक्षित आहे. हे एकदाचे एमपीएससीने जाहीर करावे. अशी भावना शुभम या विद्यार्थ्याने व्यक्त केली.

विद्यार्थ्यांचा संताप
- एमपीएससीच्या चुकीमुळे संयुक्त गट ब २०२० ही परीक्षा न्यायालयाच्या कक्षेत अडकून पडली आहे
- त्यामुळे या परीक्षेची मुख्य परीक्षा गेल्या तीन महिन्यांपासून रखडली आहे
- परीक्षा तत्काळ घ्यावी, यामागणीसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलनही केले होते
- हे सर्व ताजे असतानाच पुन्हा एमपीएससीने प्रश्न रद्द करून विद्यार्थ्यांच्या दुखऱ्या जागेवर बोट ठेवले आहे
- विद्यार्थ्यांनी एमपीएससीच्या चुका किती काळ सहन करायच्या
- यावर कायमस्वरूपी मार्ग काढला जाणार आहे का नाही?
- एमपीएससीने पुन्हा प्रश्नांवर फेरविचार करावा

एमपीएससी प्रश्न रद्द करून विद्यार्थ्यांच्या मानसिकतेशी खेळत आहे. २०२० च्या परीक्षेत असाच गोंधळ घालून ऐतिहासिक तिसरी उत्तरतालिका प्रसिद्ध केली होती. आताही तोच प्रकार केला जाणार आहे का?
- गणेश, विद्यार्थी

२०२०-२०२१ या वर्षातील परीक्षा ः रद्द केलेल्या प्रश्नांची संख्या
- संयुक्त गट ब पूर्व परीक्षा २०२१ ः ८
- राज्यसेवा पूर्वपरीक्षा २०२० ः ४
- राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२० ः २३
- राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२१ ः ८
- संयुक्त गट ब पूर्व परीक्षा २०२० ः ५
- स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा ः ७

गट ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२१
पदे - पोलिस उपनिरीक्षक विक्रीकर निरीक्षक सहायक कक्ष अधिकारी
जागा - १०८५
पूर्व परीक्षा - २६ फेब्रुवारी २०२२
मुख्य परीक्षा - ९, १७, २४, ३१ जुलै
मुख्य परीक्षेचा निकाल - २२ सप्टेंबर २०२२


विद्यार्थ्यांनो व्यक्त व्हा
‘एमपीएसी’ प्रश्न रद्द करण्याच्या कारभाराबद्दल काय वाटते? यावर आपली प्रतिक्रिया नावासह editor.pune@esakal.com या मेलवर किंवा ८४८४९७३६०२ या व्हॉट्सॲप क्रमांकावर कळवा.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c61213 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top