
भारती विद्यापीठाचा ५८वा वर्धापनदिन मंगळवारी होणार साजरा
पुणे, ता. ७ : भारती अभिमत विद्यापीठाचा ५८वा वर्धापनदिन येत्या मंगळवारी (ता.१०) साजरा होणार आहे. या कार्यक्रमासाठी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम भारती विद्यापीठाच्या धनकवडी येथील शैक्षणिक संकुलात सकाळी साडे नऊ वाजता आयोजित केला आहे.
या कार्यक्रमात ज्येष्ठ विचारवंत आणि स्ट्रेटर्जिक फोरसाईट ग्रुपचे अध्यक्ष संदीप वासलेकर हे विशेष अतिथी म्हणून सहभागी होणार आहेत. यावेळी ‘इस्कॉन’चे गौर गोपाल दास यांचे व्याख्यान होणार आहे. कार्यक्रमात विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, विद्यापीठाचे उपाध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते, कार्याध्यक्ष आनंदराव पाटील, भारती हॉस्पिटलच्या कार्यकारी संचालिका डॉ. अस्मिता जगताप, व. भा. म्हेत्रे, डॉ. के. डी. जाधव, डॉ. एम. एस. सगरे आदी उपस्थित राहणार आहेत. तसेच संस्थेतील गुणवंत विद्यार्थी, विशेष पुरस्कार प्राप्त केलेले सेवक आणि प्रशंसनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षक-शिक्षकेतर सेवकांचा ‘डॉ पतंगराव कदम सेवागौरव पुरस्कारा’ने सन्मान करण्यात येईल, अशी माहिती विद्यापीठाचे कार्यवाह आणि राज्याचे कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी दिली.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c61226 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..