विद्यापीठातर्फे नवीन शैक्षणिक धोरणाची माहिती होण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यापीठातर्फे नवीन शैक्षणिक धोरणाची माहिती होण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन
विद्यापीठातर्फे नवीन शैक्षणिक धोरणाची माहिती होण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन

विद्यापीठातर्फे नवीन शैक्षणिक धोरणाची माहिती होण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन

sakal_logo
By

पुणे, ता. ७ :
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने विद्यापीठाच्या घटकांना नवीन शैक्षणिक धोरणाची माहिती व्हावी, यासाठी ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंमलबजावणी आणि अधिकार मंडळाचे उत्तरदायित्व’ विषयावर तीन दिवसीय कार्यशाळा मुळशी तालुक्यातील एका गावात आयोजित करण्यात आली आहे. कार्यशाळेचे उद्‌घाटन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते आणि मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. आर. डी. कुलकर्णी यांच्या विशेष उपस्थितीत झाले.
विद्यापीठाचे सर्व अधिसभा सदस्य, व्यवस्थापन परिषद सदस्य आणि विद्या परिषद सदस्य या सर्वांसाठी ही कार्यशाळा आयोजित केली आहे. कार्यशाळेच्या सुरवातीला आनंद मापुसकर यांच्या व्याख्यान झाले. यावेळी ‘शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी’ विषयावर डॉ. बी. एन. जगताप यांनी विचार मांडले. तर ‘शैक्षणिक धोरणाची वैशिष्ट्ये व शैक्षणिक धोरणानुसार चार वर्षाचा पदवी अभ्यासक्रम’ विषयावर डॉ. आर. डी. कुलकर्णी यांचे व्याख्यान झाले. ‘उच्च शिक्षणातील संधी व आव्हाने’ विषयावर विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. संजीव सोनवणे, डॉ. अंजली कुरणे, डॉ. मनोहर चासकर आणि डॉ. पराग काळकर यांच्या गटचर्चेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यशाळेची सांगता रविवारी (ता.८) होणार असून यात ॲकॅडमिक क्रेडिट बँक’ विषयावर डॉ. मिलिंद मराठे यांचे व्याख्यान होणार आहे. यावेळी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी व कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार मार्गदर्शन करणार आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c61232 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top