शरद पोंक्षे यांना ‘ब्राह्मण भूषण’ पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शरद पोंक्षे यांना ‘ब्राह्मण भूषण’ पुरस्कार
शरद पोंक्षे यांना ‘ब्राह्मण भूषण’ पुरस्कार

शरद पोंक्षे यांना ‘ब्राह्मण भूषण’ पुरस्कार

sakal_logo
By

पुणे, ता. ७ : यंदाचा ‘ब्राह्मण भूषण’ पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांना आणि ‘इंदुमती-वसंत करिअर भूषण’ पुरस्कार युवा लेखक, सिनेदिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांना जाहीर झाला आहे. रविवारी (ता. ८) सायंकाळी ५.३० वाजता आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या सभागृहात हा पुरस्कार प्रदान करणार आहेत.
मानपत्र, पुणेरी पगडी व उपरणे असे पुरस्काराचे स्वरुप असून, पुरस्काराचे यंदाचे आठवे वर्ष आहे. ‘आम्ही सारे ब्राह्मण’ व ‘ब्राह्मण व्यावसायिक पत्रिका’ या दोन्ही नियतकालिकांच्या वतीने हा पुरस्कार देण्यात येतो. या वेळी शिवसंघ प्रतिष्ठानचे संस्थापक नीलेश गायकवाड, बुलडाणा अर्बन को. ऑप. क्रेडीट सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष देशपांडे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात शरद पोंक्षे लिखित ‘मी आणि नथुराम’ या पुस्तकाच्या दहाव्या आवृत्तीचे लोकार्पण होणार आहे. मुलाखतकार सुधीर गाडगीळ त्यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत, अशी माहिती भालचंद्र कुलकर्णी यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c61236 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top