विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा
विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा

विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा

sakal_logo
By

पुणे, ता. ७ ः राज्यात उन्हाचा ताप पुन्हा वाढू लागला आहे. अवकाळी पावसाची स्थिती पूर्णपणे निवळली असून उष्णता मात्र वाढत आहे. दरम्यान पुढील चार दिवस विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. उर्वरित राज्यात ही उन्हाचा चटका कायम राहणार आहे.
राज्यात शनिवारी सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद जळगाव येथे ४४.५ अंश सेल्सिअस इतकी झाली. विदर्भात बहुतांश ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली. सध्या संपूर्ण राज्यात हवामान कोरडे असून उन्हाच्या झळा असह्य होत आहेत. त्यात किमान तापमानात ही वाढ होत असल्याने रात्रीच्या वेळी देखील उकाडा जाणवू लागला आहे. विदर्भात ४० अंशांच्या वर पारा कायम असून अकोला, ब्रम्हपुरी आणि चंद्रपूर येथे कमाल तापमान ४३ ते ४४ अंशांदरम्यान आहे.
विदर्भात उन्हाची ताप वाढत असल्याने रविवारपासून (ता. ८) तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर सध्या विदर्भ आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय असून मध्य प्रदेश ते तमिळनाडूपर्यंत हवेच्या कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने राज्यात मंगळवारपासून (ता. १०) तुरळक ठिकाणी ढगाळ हवामान व पावसाची शक्यता आहे.

चक्रीवादळाची शक्यता
बंगालचा उपसागरात दक्षिण अंदमान समुद्राजवळ असलेल्या चक्राकार वाऱ्यांच्या प्रभावामुळे निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढत आहे. तर रविवारी (ता. ८) या प्रणालीची तीव्रता वाढून त्याचे रूपांतर हे चक्रीवादळात होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरातील प्रणालीची तीव्रता वाढल्याने शनिवारी तीव्र कमी दाबाचे क्षेत्र (डिप्रेशन) तयार झाले. ही प्रणाली वायव्येकडे सरकत असून रविवारी (ता. ८) ते चक्रीवादळाचे स्वरूप घेईल अशी चिन्हे आहेत. त्याचबरोबर मंगळवारपर्यंत (ता. १०) हे चक्रीवादळ उत्तर आंध्र प्रदेश, ओडिशाच्या किनाऱ्याकडे येत त्यानंतर, पश्‍चिम बंगालकडे सरकण्याची शक्यता आहे. यामुळे अंदमान निकोबार बेट समूह, उत्तर आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनाऱ्यावर जोरदार वाऱ्यासह, मुसळधार पावसाची इशारा देण्यात आला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c61251 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top