
सोनसाखळी चोरणाऱ्यांना १६ महिने सक्तमजूरी
पुणे, ता. ७ : ‘पुढे खून झाला आहे, एकट्या जाऊ नका,’ अशी बतावणी करत ज्येष्ठ नागरिक महिलेच्या हातातील सोन्याची अंगठी आणि गळ्यातील सोनसाखळी चोरणाऱ्या दोघांना न्यायालयाने १६ महिने सक्तमजुरी आणि तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रद्धा डोलारे यांनी हा निकाल दिला.
प्रभाकर येमनप्पा दोडमणी (वय २६, रा. आनंदनगर झोपडपट्टी, चिंचवड) आणि अल्ताफ सलीम शेख (वय १९, रा. हांडेवाडी चौक) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात ६२ वर्षाच्या महिलेने हिंजवडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. ही घटना दोन नोव्हेंबर २०१९ रोजी दुपारी पावणेदोनच्या सुमारास पुनावळे परिसरात घडली. घटनेच्या दिवशी फिर्यादी भाजी घेण्यासाठी पायी चालत असताना प्रभाकर आणि अल्ताफ मोटारसायकलवरून त्यांच्याजवळ आले. अल्ताफ याने फिर्यादींच्या डाव्या हाताच्या बोटातील सोन्याची अंगठी बळजबरीने काढून घेतली, तर प्रभाकरने फिर्यादींच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली आणि पोबारा केला.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c61252 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..