अपघातात मृत्यू झालेल्याच्या कुटुंबास २१ लाखांची भरपाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अपघातात मृत्यू झालेल्याच्या कुटुंबास २१ लाखांची भरपाई
अपघातात मृत्यू झालेल्याच्या कुटुंबास २१ लाखांची भरपाई

अपघातात मृत्यू झालेल्याच्या कुटुंबास २१ लाखांची भरपाई

sakal_logo
By

पुणे, ता. ७ : रस्ता ओलांडत असताना ट्रकने धडक दिल्याने मृत्यू झालेल्या एका आचाऱ्याच्या कुटुंबीयांस २१ लाख रुपये भरपाई मिळणार आहे. अर्जदारांच्या वकिलांनी जितकी भरपाई मागितली तेवढी भरपार्इ देण्याचा निर्णय शनिवारी (ता. ७) झालेल्या लोकअदालतमध्ये झाला. सत्र न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या पॅनेलने हा दावा निकाली काढला.
वडगाव बुद्रूक भागातून नऊ सप्टेंबर २०१९ रोजी संबंधित आचारी हे पायी निघाले होते. रस्ता ओलांडताना धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात त्याचा मृत्यू झाला. या घटनेची सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात नोंद केली होती. याप्रकरणी त्यांचे वडील आणि भावाने नुकसान भरपाई मिळावी, यासाठी ॲड. आशिष पटनी आणि ॲड. अनिल पटनी यांच्यामार्फत येथील मोटार अपघात न्यायप्राधिकरण येथे दावा दाखल केला होता. आयसीआयसीआय लोम्बार्ड कंपनीच्या विरोधात हा दावा दाखल केला होता.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c61253 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top