पुण्यात उन्हाचा चटका असह्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्यात उन्हाचा
चटका असह्य
पुण्यात उन्हाचा चटका असह्य

पुण्यात उन्हाचा चटका असह्य

sakal_logo
By

पुणे, ता. ७ ः उन्हाचा चटका असह्य झाला असून पुणेकरांसाठी दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे तापदायक झाले आहे. शहर आणि परिसरात काही ठिकाणी पारा ४० अंशांच्या दरम्यान असल्याने उन्हाच्या झळा चांगल्याच जाणवू लागल्या आहेत. पुढील दोन दिवस ही स्थिती अशीच कायम राहणार असून त्यानंतर मात्र ढगाळ वातावरणाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.
शनिवारी शहरात ३९.६ अंश सेल्सिअस तर लोहगाव येथे ४०.७ अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली. गेल्या दहा वर्षांतील स्थिती पाहता साधारणपणे शहरात मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पारा चाळीशीवर पोचल्याची नोंद झाली आहे. त्यात २०२१ आणि २०१२ मध्ये सर्वाधिक कमाल तापमान हे ३८ ते ३९ अंशांपर्यंत नोंदले गेले आहे. मात्र, यंदा मे महिन्यात अद्याप शहरात पारा ४० अंशांपर्यंत पोचलेला नाही. असे असले तरी उन्हाच्या झळा चांगल्याच जाणवत आहेत. हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील दोन दिवस म्हणजेच येत्या सोमवारपर्यंत (ता. ९) शहर आणि परिसरातील काही ठिकाणी पारा ४० अंशांच्या दरम्यान कायम राहण्याची शक्यता आहे. तर येत्या मंगळवारपासून (ता. १०) पुणे व परिसरात आकाश अंशतः ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. यामुळे कमाल तापमानात काहीशी घट होऊ शकते.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c61257 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top