भीमसेन जोशी जन्मशताब्दी; उद्यापासून संगीत महोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भीमसेन जोशी जन्मशताब्दी;
उद्यापासून संगीत महोत्सव
भीमसेन जोशी जन्मशताब्दी; उद्यापासून संगीत महोत्सव

भीमसेन जोशी जन्मशताब्दी; उद्यापासून संगीत महोत्सव

sakal_logo
By

पुणे, ता. ७ : पं. भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ९ आणि १० मे रोजी शास्त्रीय संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गणेश क्रीडा कला मंच येथे आयोजित या महोत्सवात पंडित हरिप्रसाद चौरासिया, आनंद भाटे यांच्यासह अनेक दिग्गज कलाकार या महोत्सवात कला सादरीकरण करणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिली.
संगीत महोत्सवाच्या पहिल्या पर्वात ९ मे रोजी सायंकाळी सहा वाजता पं. सारंगधर साठे आणि पं. प्रमोद गायकवाड यांची शहनाई आणि संवादिनी यांची जुगलबंदी सादर होणार आहे. सायंकाळी सात वाजता सानिया पाटणकर, पं. श्रीनिवास जोशी यांचे शास्त्रीय संगीत गायन होणार आहे. तर त्यादिवशी रात्री साडेआठ वाजता बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरासिया यांचे बासरीवादन सादर होईल. 
महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी १० मे रोजी सायंकाळी सहा वाजता पं. मारुती पाटील यांचे सितार वादन होईल. शर्वरी जेमिनीस व सहकारी यांचे सायंकाळी सात वाजता कथ्थक नृत्य सादरीकरण होईल. महोत्सवाची सांगता रात्री साडेआठ वाजता पं. आनंद भाटे यांच्या गायनाने होणार आहे. सर्व रसिक प्रेक्षकांसाठी हा संगीत महोत्सव विनामूल्य आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c61262 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top