महिलांनी ठरवले तर त्या काहीही करू शकतात महिला उद्योजिकांचा विश्वास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महिलांनी ठरवले तर त्या काहीही करू शकतात  
महिला उद्योजिकांचा विश्वास
महिलांनी ठरवले तर त्या काहीही करू शकतात महिला उद्योजिकांचा विश्वास

महिलांनी ठरवले तर त्या काहीही करू शकतात महिला उद्योजिकांचा विश्वास

sakal_logo
By

पुणे, ता.७ ः महिलांनी मनात आणले तर त्या काहीही करू शकतात, असा ठाम विश्वास आज आर्थिक क्षेत्रात यशस्वी ठरलेल्या उद्योजिकांनी व्यक्त केला. जीतो कनेक्ट २०२२ या आंतरराष्ट्रीय परिषदेत झालेल्या महिलांच्या पहचान या सत्रात मुंबई शेअर बाजाराच्या माजी अध्यक्ष दीना मेहता, फॅशन डिझायनर निवेदिता साबू, लक्झरी ज्वेलरी डिझायनर पूनम सोनी, रेस्टॉरंट व्यावसायिक सोनल बरमेचा आणि सुपर बॉटम्स कंपनीच्या संस्थापक पल्लवी उटगी सहभागी झाल्या होत्या.

देशातील सर्वांत मोठ्या शेअर बाजारापैकी एक असलेल्या मुंबई शेअर बाजाराच्या अध्यक्ष पदाची धुरा यशस्वीपणे सांभाळणार्या, गेली तीस वर्षे शेअर व्यवसायात कार्यरत असलेल्या दीना मेहता यांनी शेअर बाजार आणि जीवनाचे नाते उलगडले. चढ-उतार हा शेअर बाजाराचा स्थायीभाव आहे. तसाच तो आयुष्याचाही. ही नकारात्मक बाब नाही तर ती संधी आहे. हे लक्षात आले की पैसा कमावता येतो. जीवनातले चढ-उतारही यशस्वीपणे पार करता येतात. यासाठी स्वयंशिस्त महत्त्वाची ठरते. महिला उत्तम संतुलन सांभाळू शकतात, त्यामुळे या क्षेत्रातही त्या सहज यशस्वी होऊ शकतात, असे मत मेहता यांनी व्यक्त केले.
व्यवसाय करताना महिला म्हणून आव्हाने येतात मात्र हार न मानता त्याचा सामना केला की सर्वांचा दृष्टीकोन बदलतो, हे महिलांनी लक्षात ठेवले पाहिजे असे पल्लवी उटगी म्हणाल्या. तुमच्याकडे आत्मविश्वास असेल, तुम्ही खंबीर असाल तर महिला म्हणून कोणीही तुम्हाला मागे खेचू शकत नाही, असे मत निवेदीता साबू यांनी व्यक्त केले.
कोणत्याही वयात करिअर घडवता येते. वय हा तुमच्या प्रगतीत अडथळा ठरू शकत नाही, असे सोनल बरमेचा म्हणाल्या.
आपण निर्धार केला तर आपण आपले ध्येय साध्य करू शकतो. आपण कारणे देतो ते आपल्याला ते काम करायचे नसते म्हणून, असे पूनम सोनी यांनी सांगितले.

जीतो संघटनेच्या महिला विभागाच्या सदस्यांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.

फोटो ओळ - पुणे, मार्केट यार्डः जीतो कनेक्ट परिषदेत पहचान सत्रात सहभागी झालेल्या आर्थिक क्षेत्रातील यशस्वी महिला पूनम सोनी, निवेदिता साबू, दीना मेहता, पल्लवी उटगी आणि सोनल बरमेचा

फोटो - PPRTT22B0737

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c61275 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top