ग्रिप्स नाट्य महोत्सवाला सुरुवात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ग्रिप्स नाट्य महोत्सवाला सुरुवात
ग्रिप्स नाट्य महोत्सवाला सुरुवात

ग्रिप्स नाट्य महोत्सवाला सुरुवात

sakal_logo
By

पुणे, ता. ९ ः अभिनयाचे धडे, सेल्फी पॉइंटवरची धमाल, माईंड गेम, आवडती पुस्तके, फ्लॅश मॉब आणि नाटक अशी रेलचेल लहानग्यांना शनिवारी अनुभवता आली. निमित्त होते ग्रिप्स नाट्य महोत्सवाचे. रेनबो अम्ब्रेला फाउंडेशन आणि महर्षी कर्वे स्री शिक्षण संस्थेच्या स्कूल ऑफ मीडिया अँड टेक्नॉलॉजी यांच्यातर्फे आयोजित ग्रिप्स नाट्य महोत्सवाला नुकतीच सुरुवात झाली. कर्वेनगर येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या रमा पुरुषोत्तम संकुलात झालेल्या या कार्यक्रमात आयोजक श्रीरंग गोडबोले, हृषिकेश देशपांडे, विभावरी देशपांडे, राधिका इंगळे आणि संगीतकार राहुल रानडे उपस्थित होते. यावेळी विभावरी देशपांडे लिखित आणि दिग्दर्शित ‘प्रोजेक्ट आदिती’ नाटकाचा प्रयोग सादर झाला. यामध्ये सुहानी धडफळे, प्रियांका गांधी, तेजस साने, संकेत पारखे, मंथन महाडीक, राधिका इंगळे, नितीन अग्निहोत्री, चंद्रशेखर कुलकर्णी, मुक्ता कम्पलीकर या कलाकारांचा सहभाग होता, तर राहुल रानडे यांचे संगीत होते.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c61550 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top