वकिलास मारहाण करणाऱ्या पाच जणांना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वकिलास मारहाण करणाऱ्या पाच जणांना अटक
वकिलास मारहाण करणाऱ्या पाच जणांना अटक

वकिलास मारहाण करणाऱ्या पाच जणांना अटक

sakal_logo
By

पुणे, ता. ९ ः भरदिवसा वकिलाच्या घरात घुसून वकिलास मारहाण करीत त्यांचे वडील व कामगाराला शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली, याप्रकरणी पाच जणांना स्वारगेट पोलिसांनी अटक केली. टोळक्‍याने वकिलाची दुचाकी चोरून नेली होती. ही घटना शनिवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पुणे-सातारा रस्त्यावरील आदिनाथ सोसायटीत घडली.

हनुमंत श्रीकांत पाटेकर (वय ३१, रा. जाधववाडी, चिखली), सुग्रीव भीमराव गायकवाड (वय ५७, रा. चिखली), विनयकुमार अंबिकाप्रसाद यादव (वय २२, रा. रावेत), दिलीप फुलचंद निर्मल (वय ३३ , रा. चंदननगर), शत्रुघ्न सुखदेव पोकळे (वय ३५, रा. वडगाव शेरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी ॲड. अमित शहा (रा. आदिनाथ सोसायटी, स्वारगेट) यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

शहा यांची कात्रज येथे प्राणीमित्र संस्था आहे. त्यांनी एका कंपनीकडून चार दुचाकी घेतल्या होत्या. या दुचाकीचे काही पैसे परत करायचे राहिले आहेत. या कारणावरून थकीत हप्ते वसुली करणारे खासगी कंपनीतील आरोपी शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास शहा यांच्या घरात शिरले. शहा यांनी घराचा दरवाजा उघडताच टोळक्‍याने त्यांना दमदाटी करून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. शहा यांच्या वडिलांनाही जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून दुचाकीची चावी व मोबाईल हिसकावला. त्यांच्या कामगारालाही जीवे मारण्याची धमकी देत त्याच्याकडील मोबाईलही हिसकावून घेतला. त्यानंतर स्वारगेट पोलिसांनी तत्काळ पाच जणांना अटक केली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक इंदलकर, निरीक्षक (गुन्हे) सोमनाथ जाधव, उपनिरीक्षक तुषार भोसले, सोमनाथ कांबळे, संदीप साळवे, शिवाजी सरक यांच्या पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक तुषार भोसले करीत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c61641 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top