
जोस आलुक्कासचे १०० दिवसांचे सेलिब्रेशन
पुणे, ता. ९ ः जोस आलुक्कासने पुण्यामध्ये १०० दिवसांचा टप्पा यशस्वीपणे गाठल्याबद्दल सोन्याची व हिऱ्याच्या दागिन्यांच्या खरेदी करणाऱ्या आणि लकी ड्रॉमध्ये विजयी ठरलेल्या ग्राहकांना भेटवस्तू देण्यात आल्या.
या बहुप्रतीक्षेत मोहिमेचा कालावधी संपुष्टात आलेला आहे आणि ब्रॅंडने त्यांच्या भाग्यवान विजेत्यांची घोषणा केलेली आहे. पाषाण एसयूएस रोडवरील अरुण कुंभार, कोथरूडमधील धनश्री बांदल, पिंपरीतील स्मिता शिराळकर हे भाग्यवान विजेते ठरले आहेत. डेक्कन जिमखाना स्थानकाचे सहायक आयुक्त बाप्पासाहेब झरेकर यांच्या हस्ते विजेत्यांना होम ॲप्लायन्सेसचे वाटप करण्यात आले.
शोरूमचे व्यवस्थापक प्रवीण यांनी पुणेकरांनी दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल आभार मानले. सोन्याच्या आणि हिऱ्याच्या दागिन्यांची खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी जोस आलुक्कासने लकी ड्रॉ पहिल्या १०० दिवसांत आयोजित केला होता.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c61645 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..