
सातत्याने वेगळा विचार करा
विषय : क्रिएटिव्ह थिंकिंग
क्रिएटिव्ह थिंकिंग हे तंत्र मानवाच्या उत्क्रांतीपासून वापरण्यात आलेले आहे. चाकोरीबाहेरील विचार करणे हे याचे मूळ आहे. कल्पकता, सृजनात्मक विचार याचा समावेश यात होतो. छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र हेच ‘क्रिएटिव्ह थिंकिंग’चे स्रोत आहेत. त्यातून प्रेरणा घेत तरुणांनी सातत्याने प्रयत्न करायला हवेत. अवती-भवती पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे शोधणे, समस्येवर तोडगा काढणे, समृद्ध आणि समाधानी आयुष्य जगणे, यासाठी ‘क्रिएटिव्ह थिंकिंग’ उपयोगाचे आहे. खरंतर प्रत्येकामध्ये क्रिएटिव्ह थिंकिंगच्या क्षमता असतात. पण त्या वापरायच्या कशा, निर्भीडपणे मांडायच्या किंवा सादर करायच्या कशा, हे आव्हानात्मक आहे. लोक काय म्हणतील, लोकांना काय वाटेल, अपयशाची वाटणारी भीती हे यातील अडथळे आहेत. क्रिएटिव्ह थिंकिंग हे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात महत्त्वाचे असते. त्यासाठी प्रत्येकानेच सातत्याने वेगळा विचार करायला हवा.
- प्रसाद शिरगावकर, व्हर्सेटाइल डिजिटल टेक्नॉलॉजी क्षेत्रातील व्यावसायिक
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c61653 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..