
कारागृहातील बंदिजनांसाठी राज्यस्तरीय अभंग-भजन स्पर्धा
पुणे, ता. ९ : शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानने देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि संस्थेच्या रौप्यमहोत्सवाचे निमित्त साधून कारागृहातील बंदिजनांसाठी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज राज्यस्तरीय अभंग व भजन स्पर्धा २०२२ चे आयोजन केले आहे. बंदिजनांसाठी आयोजित केलेली देशातीलच नव्हे तर आशिया खंडातील एकमेव आणि पहिलीच स्पर्धा असल्याचा दावा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि स्पर्धाप्रमुख लक्ष्मीकांत खाबिया यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला.
यावेळी पंडित रघुनाथ खंडाळकर, प्रा. सगिरा शेख, प्रा. शिवानी अबनावे उपस्थित होते. या स्पर्धेत एकूण २७ संघ सहभागी झाले आहेत. ही स्पर्धा २० ते ३० मे या कालावधीत प्रत्येक कारागृहात होणार आहे. कारागृहांमध्ये शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या कलागुणांना भक्तिमार्ग, अध्यात्म व भजनाद्वारे वाव मिळावा, बंदिजनांमध्ये सकारात्मक विचार वाढीस लागावे, थोडा विरंगुळा मिळावा, या उद्देशाने या स्पर्धांचे आयोजन केले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c61654 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..