अभय ठाकूर यांना पुरस्कार प्रदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अभय ठाकूर यांना 
पुरस्कार प्रदान
अभय ठाकूर यांना पुरस्कार प्रदान

अभय ठाकूर यांना पुरस्कार प्रदान

sakal_logo
By

पुणे, ता. ९ : सेंट मदर टेरेसा युनिव्हर्सिटी फॉर डिजिटल एज्युकेशन एक्सलन्स अँड सस्टेनेबिलिटी डेव्हलपमेंटने अभय ठाकूर यांना ‘चित्रपट निर्मिती’ या श्रेणीतील नेल्सन मंडेला नोबेल पिस पुरस्कारासाठी मानद डॉक्टरेट प्रदान केली.
युनायटेड स्टेट्समधील जेबीआर हार्वर्ड विद्यापीठाने याला मान्यता दिली आहे. जे केंब्रिज डिस्टन्स स्कूल ऑफ एज्युकेशन, युनायटेड किंग्डमशी संलग्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधू डॉ. प्रल्हाद मोदी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ठाकूर यांनी त्यांच्या ‘एनिग्मा-द फॉलन एंजेल’ या लघुपटाद्वारे, वर्ल्डफेस्ट ह्यूस्टन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, दि बेस्ट शॉर्टस कॉम्पिटिशन एलए, दि हॉलीवूड इंडी फिल्म ॲवॉर्ड्स, दि पॅरिस प्ले, बर्लिन इंडी फिल्म फेस्टिव्हल, ईस्टर्न युरोप इंटरनॅशनल मूव्ही ॲवॉर्ड्स, टोरँटो फिल्म चॅनल ॲवॉर्ड्स, आणि मास्टर्स ऑफ सिनेमा (रशिया) यासारख्या जगातील सर्वात प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवामध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c61661 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top