
संस्कारांची रूजवण
- शिवशंकर सुफळकर, व्हीआयआयटी (पुणे) : ‘चला घडू देशासाठी’ या ब्रीदवाक्याला अनुसरून भविष्यातील देशाचे जबाबदार नेतृत्व घडविण्यासाठी आवश्यक असणाऱ्या संस्कारांची रूजवण कार्यक्रमातून होत आहे. अशा कार्यक्रमाचा एक भाग होता आले, याचा मनस्वी आनंद आहे. यानिमित्ताने विविध क्षेत्रातील दिग्गजांना ऐकण्याची संधी मिळत आहे.
- धनश्री राजपूत, इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (पुणे) : हा कार्यक्रम अतिशय छान असून खूप शिकायला मिळत आहे. याद्वारे विविध क्षेत्रातील दिग्गज मार्गदर्शन करत असून ते उपयुक्त ठरत आहे. तरुणांनी ‘सकारात्मक कसे राहावे’, ‘सर्जनशील विचार कसे निर्माण करावे’ याबद्दल ते बोलत आहेत. करिअरची दिशा ठरविताना यातून मिळणारे मार्गदर्शन मोलाचे ठरणार आहे.
- आकांक्षा सातपुते, संगमनेर कॉलेज (संगमनेर) : कोणत्याही एका विषयाला अनुसरून व्याख्यान आयोजित न करता आयुष्याच्या महत्त्वाच्या वळणावर आमच्यासारख्या तरुणांना योग्य मार्गदर्शन मिळावे, यासाठी अनेक क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांना एकाच छताखाली आणण्याचे काम ‘यिन’च्या माध्यमातून झाले आहे.
- ओम सावंत, बी. के. बिर्ला कॉलेज (कल्याण) : यिन समिट हा कार्यक्रम आमच्यासाठी खूप छान अनुभव देणारा आहे. अनेक जाणकार वक्ते स्वतःच्या जीवनातील अनुभवासह खूप मोलाच्या गोष्टींवर भाष्य करत आहेत. त्यांनी केलेले मार्गदर्शन आमच्यासाठी उपयुक्त ठरणार असून त्यातून एक चांगला मार्ग मिळेल.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c61677 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..