
पाच लाख रुपयांची रोकड लंपास
पुणे, ता. ९ ः जितो कनेक्ट २०२२ या परिषदेमधील व्यापार विषयक प्रदर्शनात असलेल्या विविध व्यावसायिकांच्या चार स्टॉलमधून चोरट्यांनी पाच लाख रुपयांची रक्कम चोरुन नेली. ही घटना शनिवारी व रविवारी बिबवेवाडी येथील गंगाधाम परिसरात घडली. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी व्यावसायिक नीलेश पारख (वय ४७, रा. चव्हाणनगर, धनकवडी) यांनी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्केट यार्ड-कोंढवा रस्त्यावर ‘जितो कनेक्ट २०२२’ हे तीन दिवसीय परिषद व प्रदर्शन आयोजित केले होते. या प्रदर्शनामध्ये व्यावसायिकांचे व्यापार विषयक प्रदर्शनही भरविले होते. या प्रदर्शनामध्ये व्यावसायिकांनी स्टॉल लावले होते. रविवारी या प्रदर्शनाची सांगता झाली. त्यावेळी फिर्यादी पारख, प्रशांत लुणावत, प्रतीक रांका यांच्या स्टॉलमधील काऊंटरमधून चोरट्यांनी आणि योगेश चुत्तर यांच्या स्टॉलसह अन्य दोन स्टॉलमधून रोख रक्कम चोरुन नेल्याचे उघड झाले. चोरट्यांनी चार लाख ५५ हजार रुपयांची रोख रक्कम, हिरेजडीत ब्रेसलेट व दोन मोबाईल असा सुमारे पाच लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेला. स्टॉलमध्ये चोरी झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर व्यावसायिकांनी पोलिसांकडे फिर्याद दिली. त्यानुसार, पोलिसांनी तपासासाठी प्रदर्शनातील सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक संजय आदलिंग करीत आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c61681 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..