पालखीला खांदा दिल्यावरून दगडाने मारहाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालखीला खांदा दिल्यावरून दगडाने मारहाण
पालखीला खांदा दिल्यावरून दगडाने मारहाण

पालखीला खांदा दिल्यावरून दगडाने मारहाण

sakal_logo
By

पुणे, ता. ९ ः पालखीला खांदा दिल्याच्या कारणावरून पाच जणांच्या टोळक्‍याने एकास शिवीगाळ करीत दगडाने मारहाण केली. याबरोबरच जीवे मारण्याची धमकीही दिली. ही घटना शनिवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास आंबेगाव बुद्रुक येथील जांभूळवाडी येथे घडली.

धीरज बाळकृष्ण जांभळे (वय ३३, रा. जांभूळवाडी, आंबेगाव खुर्द) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्यासह पाच जणांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अजय जांभळे (रा. जांभूळवाडी, आंबेगाव खुर्द) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबेगाव खुर्द येथील जांभूळवाडी गावात शनिवारी रात्री बापुजीबुवा देवाचा पालखी सोहळा सुरू होता. त्यावेळी धीरज जांभळे व अन्य चार ते पाच जणांनी फिर्यादी यास पालखीला खांदा लावू न देता शिवीगाळ व मारहाण केली, तसेच फिर्यादीच्या डोक्‍यात दगडाने मारहाण केल्याने ते गंभीर जखमी झाले. ‘तुम्हा वाडीवाल्यांना पालखीला खांदा देण्याचा अधिकार नाही. तुम्ही इथून सुटा, नाहीतर तुम्हाला जड जाईल’ तसेच ‘कागदी घोडे कसे असतात, हे तुम्हाला दाखवितो'' अशी धमकी त्यांनी दिली. या भांडणामध्ये फिर्यादीच्या गळ्यातील सोनसाखळी चोरीला गेली. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक अंकुश कर्चे करीत आहेत.
----

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c61688 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top