
टपाल कार्याल.
‘पोस्टिक’ दीड तास
पु, ल. देशपांडे यांनी ‘माझे पोस्टिक जीवन’ नावाने पोस्ट कार्यालयातील कार्यपद्धती, तेथील अधिकारी, कर्मचारी, त्यांची नागरिकांशी लागण्याची पद्धत यावर विनोदी शैलीत बोट ठेवलं आहे. तसाच काही अनुभव सोमवारी कोंढवा (एनआयबीएम) टपाल कार्यालयात आला. नऊ वाजता उघडणारं कार्यालय उघडायला सव्वानऊ वाजले. त्यानंतर कळलं की सिस्टिम डाउन आहे. ना पैसे भरता येणार ना पैसे काढता येणार. थोडक्यात कसालही व्यवहार शक्य नाही. रांगेत ९० टक्के ज्येष्ठ नागरिक होते. ‘दुरुस्तीसाठी माणूस बोलवलाय’ एका कर्मचाऱ्याने ‘महत्त्वाची’ माहिती दिली. ‘दहापर्यंत येणार’ आणखी आश्वासक माहिती पुढे आली. पण नऊ ते साडेदहा असा दीड तासानंतर ‘आज काही होणार असं वाटतं नाही’ असं वाक्य ऐकू आलं आणि पोस्ट कार्यालय रिकामं झालं.
ज्येष्ठ नागरिकांचे म्हणणे
- आठवड्यातून दोन-तीनदा करी ही समस्या असते
- एकाच कामासाठी परत-परत यावे लागते
- छोट्याशा कामासाठी तासन्तास उभे राहावे लागते
- अनेक वेळा सांगूनही अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्या
- ज्येष्ठांसाठी स्वतंत्र खिडकी सुरु करावी (जागा उपलब्ध आहे)
- टोकन पद्धत केल्यास ज्येष्ठ नागरिक बाहेर बसू शकतात
- वारंवार होणाऱ्या तांत्रिक बिघाडावर कायमची उपाययोजना करावी.
नोकरीची सुवर्णसंधी
भारतीय डाक विभागात ग्रामीण डाक सेवक पदांच्या एकूण ३८,९२६ जागा असून त्यापैकी मराठी, कोकणी भाषा येत असलेल्यांसाठी राज्यातील ग्रामीण डाक सेवक पदांच्या एकूण ३,०२४ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. या पदासाठी ६ जून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येतील.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c61699 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..